विरोधी पक्षनेत्यांचा सरकारला इशारा, ‘वेळ पडल्यास जागा दाखवू…’
धनगर आरक्षणाबाबत कोणी मुददा पेटवला का? मग आता ते त्यांना आरक्षण का देत नाहीत हा प्रश्न आहे. मराठा आरक्षणावरून केंद्राने आणि राज्याने मराठ्यांची फसवणुक केली. यासाठी स्वतंत्र अधिवेशन घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | महिलांना आरक्षण द्यावे ही कॉंग्रेसची आधीपासूनचीच भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण हे कॉंग्रेसने दिले. भाजपने आणलेलं महिला आरक्षण कधी लागू होणार हे माहित नाही. मात्र, हे आरक्षण तात्काळ लागू करावं ही कॉंग्रेसची मागणी आहे. त्याचबरोबर जातनिहाय जनगनना व्हावी अशी कॉंगेसची मागणी आहे. पहिलं तुम्ही आम्हाला मत द्या, मग आरक्षण देतो ही भाजपची भूमिका आहे. केंद्राने घोषणाबाजी करण्यापेक्षा महिलांना आरक्षण तात्काळ लागू करायला हवे, हा फक्त जुंमला आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली.
भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना ‘मला कॉंग्रेसमध्ये १७ वर्ष झाली. पण, ते जिथे जिथे गेल ते तिथे रुळलेत का ? हा प्रश्न आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. दुसऱ्याच्या अंगावरचं पाघरून खेचून घेणं, स्वत:चं अंग वाचवणं आणि दुसऱ्याला नागडं करण हे कितपत योग्य आहे. स्वत: काही करायचं नाही, दुसऱ्याचं ओरबाडून घेणं योग्य नाही, अशी टीका त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली.
ठाण्यातील आमदार मुख्यमंत्र्यांवर बोलतो. भाजपचा आमदार दादांवर खालच्या भाषेत बोलतो यावरून महायुत्तीत काही अलबेल नाही हे दिसून येते. दादांचा दरारा हा आपण ऐकून होतो. पण, आता दादा वाघ आहेत. सिंह आहेत की हत्ती आहे हे दाखवण्याची वेळ आली आहे. लाचारी पत्करणाऱ्यांना अशा टिकांना सामोरे जावेच लागणार असा टोला त्यांनी लगावला.
राज्यात ढगांचा पाऊस पडत नाही. पण, टग्याचा पाऊस पडतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिलेत. सत्ताधारी आपआपसात टिका करण्यात व्यस्त आहे. शेजारील राज्यांनी दुष्काळ जाहिर केला. दुष्काळी भागातील ५ ते ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. काँग्रसचे आणि इतर ६० आमदार सोडून त्यांनी बाकी सर्व फोडून फोडून साफ केले. आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडत आहोत. पण, सरकार शेतकऱ्याला गृहित धरून चाललंय. मात्र, वेळ पडल्यावर हेच शेतकरी यांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशाराही त्यांनी दिला.