Unseasonal Rain : या जिल्ह्याला पावसाने झोडपले, रस्त्यांची चाळण, वीज पुरवठा खंडित

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमतेसाठी प्रात्यक्षिक देण्यातं आलं आहे. जिल्ह्यातील 3 लाख 10 हजार हेक्टरवर होणार सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Unseasonal Rain : या जिल्ह्याला पावसाने झोडपले, रस्त्यांची चाळण, वीज पुरवठा खंडित
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 2:23 PM

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील सरपखेड, धोडप बुद्रुक, लेहणी, डोणगाव या आंतरजिल्हा मार्गाची खड्ड्यांमुळं चाळण झाली असून अवकाळी पावसाने (unseasonal rain) या मार्गावरील खड्यांत पाणी साचल्याने वाहन चालकांना  (maharashtra news)गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागतं आहे. मागील 10 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्यानं अनेकांना पाठीचे आणि मणक्यांचे आजार जडले आहेत. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र अद्याप मार्गाची दुरुस्ती करण्यात न आल्याने रुग्ण, वृध्द आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अनेकदा प्रकार दाखल करुनही  प्रशासन  दखल घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

3 लाख 10 हजार हेक्टरवर होणार सोयाबीनची पेरणी

वाशिम जिल्ह्यातील आगामी खरीप हंगामामध्ये सर्वाधिक 3 लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर इतर 1 लाख हेक्टरवर तुर, कपाशी, ज्वारी सह इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. खरिपाच्या पेरणीसाठी सोयाबीन, तूरीच्या घरगुती बियाण्याची उगवण क्षमता वाढावी आणि त्यापासून चांगले उत्पन्न मिळावे. यासाठी घरगुती बियाण्याची उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रियेच प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन जिल्ह्यातील साखरासह अनेक ठिकाणी कृषी विभागाकडून देण्यात आले आहे. बियाणांची उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रियेच जिल्ह्यातील 4 हजार 700 महिला बचत गट आणि समूहांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

वादळी वाऱ्यामुळे वीज खांब कोसळले, वीज पुरवठा खंडित

वाशिम जिल्ह्यात दोन दिवस अगोदर झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे सरपखेड, धोडप शिवारातील उच्च दाब वाहिनीचे अनेक खांब कोसळल्याने वीज, शेती वीज पंपांचा पुरवठा खंडित झाला होता. मोठ्या प्रमाणात खांब पडून वीज तारा आणि साहित्य तुटून महावितरण चे मोठे नुकसान झाले आहे. हे कोसळलेले खांब बदलन्याचे काम सुरू असून लवकरच खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महवतीरण कडून देण्यात आली आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....