“जिल्हाधिकारी, तहसिलदारांनी फोन नाही उचलला तर मला फोन करा”; नुकसानग्रस्तांना या मंत्र्यांनी दिला धीर
अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही वाया गेला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचे संकट तर दुसरीकडे शासकीय कर्मचारीवर्ग बेमुदत संपावर गेल्यामुळे आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण या चिंतेत शेतकरी आहे. गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळे गहू, कांदा, मका, ज्वारी, कलिंगड, टरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असतानाच शासकीय कर्मचारी संपावर गेल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत होता.
मात्र आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शनिवारी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे उरलेसुरले पीकंही वाहून गेली आहेत.
अनेकांचा हाता तोंडाशी आलेला घास गेला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
अवकाळी पावसानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहिला नाही पाहिजे.
तर ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले असतील त्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांशी संपर्क साधावा. त्यांनी जर फोन उचलत नसतील तर थेट माझ्याशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानीच्या पाहणीचे आदेश दिले असल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.