हजारोंच्या गर्दीत वळू उधळला, 14 जण जखमी, पाहा Video
उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरुसाच्या धार्मिक कार्यक्रम सुरु होता. गुरुवारी पहाटे 3 वाजता अचानक वळू उधळला. यावेळी धावपळ झाली अन् मोठी चेंगराचेंगरी झाली.
संतोष जाधव, उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरामधून (Osmanabad) धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रम सुरु असताना वळू (Bull) उधळला. भल्या पहाटे हजारोंची गर्दी असताना ही घटना घडली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 14 भाविक जखमी झाले आहेत. जखमींना उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस व वैद्यकीय पथक तात्काळ हजर झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवता आले. तसेच जखमीवर प्रथमोपचार करुन त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरुसाच्या धार्मिक कार्यक्रम सुरु होता. गुरुवारी पहाटे 3 वाजता अचानक वळू उधळला. यावेळी धावपळ झाली अन् मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 14 भाविक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरोकोळ जखमी भाविकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
कोरोनानंत उरुस
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून उरुस झाला नव्हता. आता अखेर कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर यंदाच्या वर्षी उरुस काढण्यात आला होता. या उरुसमध्ये सर्वधर्मियांचा सहभाग असतो. दोन ते तीन दिवस हा उरुस चालतो. रात्रभर या उरुसात सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी होते. गुरुवारी पहाटे उरुस सुरू होता. हजारो भाविक उरुसात सहभागी झाले होते. अचानक एक वळू या गर्दी घुसला अन् धावपळ उडाली. वळू गर्दीत घुसला असताना काही भविक आपल्या मोबाईलमधून चित्रीकरण करण्यात व्यस्त होते.
भाविक घाबरले
गर्दीत अचानक वळू आल्यामुळे भाविक भयभीत झाले. धावपळ उडाली. त्यात चेंगराचेंगरी झाली. भाविक भयभीत काही न पाहता पळू लागले. यामुळे चेंगराचेंगरीत 14 भाविक जखमी झाले. या घटनेत काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
जखमी रूग्णालयात दाखल होताच तिथे उपस्थित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, डॉ.. कुरूंद, डॉ. राऊत यांच्या टीमने तातडीने उपचार केले. जखमी भाविकांत सर्वाधिक अकराजण उस्मानाबादेतील असून दाेघे कर्नाटक राज्यातील तर एकजण परंडा येथील आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.