EXCLUSIVE : कोरोना काळात रुग्णालयाकडून लुटालूट, खोटे रिपोर्ट दाखवून पैसे उकळ्याचे पुरावे, टोपे दखल घेणार?

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाची परवानगीच रद्द करण्याचेही निर्देश दिले आहेत. (Osmanabad Shendge Hospital and research center)

EXCLUSIVE : कोरोना काळात रुग्णालयाकडून लुटालूट, खोटे रिपोर्ट दाखवून पैसे उकळ्याचे पुरावे, टोपे दखल घेणार?
Osmanabad hospital, Rajesh Tope
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 12:01 PM

उस्मानाबाद : कोरोनाकाळात रुग्णांसाठी रुग्णालयं देवदूत ठरली. मात्र काही रुग्णालयांनी याला हरताळ फासल्याचं दिसतंय. राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारा प्रकार उस्मानाबादमध्ये (Osmanabad Shendge Hospital and research center) घडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (Mahatma Phule jan arogya yojana) आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) संलग्नता रद्द करण्याची लेखी शिफारस, जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. इतकंच नाही तर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या रुग्णालयाची परवानगीच रद्द करण्याचेही निर्देश दिले आहेत. (Osmanabad collector Kaustubh Diwegaonkar recommendation to revoke shendge hospital license )

शेंडगे रुग्णालयात रुग्णांवर उपचाराच्या नावाखाली सुरु असलेल्या आर्थिक लुटीसह अनेक गैरप्रकाराचा लेखी अहवाल जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य सरकारकडे केली आहे. या रुग्णालयाच्या तक्रारींचे स्वरूप गंभीर असल्याने सेवास्तर करार नुसार रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

रुग्णांकडून पैसे उकळले

उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी 8 वेगवेगळ्या मुद्यात शेंडगे रुग्णालयाला आर्थिक लूट आणि चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय सेवा देऊन रुग्णाची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. ज्यात सरकारी योजनेचा लाभ घेऊनही जादा बिल आकारणे , नियमात असतानाही उपचार नाकारणे, रक्तचाचणीचे लॅबचे अतिरिक्त बिल आकारणे, रुग्ण तात्पुरत्या स्वरूपाची कृत्रीम श्वसन यंत्रणेवर असल्याचे भासवून जादा रकमेचे पॅकेज घेणे आणि नंतर रुग्णाला सामान्य विभागात पाठविणे,एकच बनावट तपासणी रिपोर्ट जोडून (एबीजी) वेगवेगळ्या रुग्णाचे फुले योजने अंतर्गत इन्शुरन्स पॅकेज घेऊन, मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करणे. यासारखे गंभीर प्रकार चौकशीत सापडले असून त्यात दोषी ठरविल्याने योजना रद्द करण्याची शिफारस केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा लेखी अहवाल

उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील रुग्ण लुटीचे आणि चुकीच्या पद्धतीचे उपचाराचे प्रकार पुराव्यासह चौकशी अहवालात समोर येत आहेत. अनेक रुग्णांनी केलेल्या तक्रारी आणि महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना आणि एम डी इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी लेखी अहवाल लिहिला आहे.

Osmanabad Shendge Hospital and research center

Osmanabad Shendge Hospital and research center

आरोग्ययोजनेअंतर्गत उपचार तरीही अतिरिक्त पैसे उकळले

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्ययोजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांना, उपचार घेत असतानाही त्यांच्याकडून शेंडगे रुग्णालयात अतिरिक्त लॅब तपासणीचे पैसे घेतले जात होते. शेंडगे रुग्णालय फुले योजनेत समाविष्ट असतानाही, एका रुग्णाला या योजने अंतर्गत उपचार नाकारले. एकच बनावट तपासणी रिपोर्ट जोडून (एबीजी) वेगवेगळ्या रुग्णाचे फुले योजने अंतर्गत इन्शुरन्स पॅकेज घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करणे, रुग्ण तात्पुरत्या स्वरूपाची कृत्रीम श्वसन यंत्रणेवर असल्याचे भासवून जादा रकमेचे पॅकेज घेणे आणि नंतर रुग्णाला सामान्य विभागात पाठविणे असे गंभीर प्रकार शेंडगे रुग्णालयात झाल्याचे समोर आले आहे.

रुग्णालयाची बदमाशी

एक महिला रुग्णाला आयसीयूमध्ये अॅडमिट केल्याचे भासवून, या योजनेतून पैसे लाटले. रुग्ण याकूब आलुरे यांच्याकडून योजनेतून उपचार देऊनही त्यांच्याकडून १२ हजार १८० रुपये अतिरिक्त आकारले. तसेच रुग्ण सुलताना सैफन शेख यांच्याकडून ४० हजार व रुग्ण विजय भीमा जाधव यांना योजनेत उपचार देऊन सरकारकडून पैसे घेतले व रुग्णाकडून ९२ हजार घेतले. शेंडगे रुग्णालयाचे हे कृत्य महात्मा फुले योजनेच्या कलम ६.१ , ६.२ , २७. १ (सेवा स्तर करार) यांचे उल्लंघन असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Osmanabad Shendge Hospital and research center

Osmanabad Shendge Hospital and research center

एकाच प्रकारची चूक वारंवार

शेंडगे रुग्णालयाने एकाच प्रकारची चूक वारंवार केली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या रुग्णालयाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची संलग्नता रद्द करणे, रुग्णालयाविरुद्ध तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे त्यानुसार रुग्णालयाचे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा २००६ अंतर्गत रुग्णालयाचा परवाना रद्द करणे, यासाठी कारवाईची शिफारस जिल्हाधिकारी तथा फुले योजनेचे जिल्हा सनियंत्रण आणि तक्रार निवारण समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे.

अॅडमिट नसतानाही बनावट बिले

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे लॅब ब्लड रिपोर्ट गरजेनुसार कमी जास्त म्हणजे चुकीचे बनविल्या प्रकरणी आणि रुग्ण अॅडमिट नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून वैद्यकीय बील उचलल्या प्रकरणी उमरगा येथील डॉ शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे आणि तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे यांना त्रिसदस्यीय चौकशी समितीने दोषी ठरविले आहे. चौकशी समितीने या घोटाळ्या प्रकरणी चौकशी अहवालानुसार पोलिसात तक्रार द्यावी यासाठी पोलीस विभागाने ४ वेळेस लेखी समजपत्र देऊनही तक्रार न दिल्याने अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही.

कोरोना काळात शेंडगे रुग्णालयाने रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर अंदाजित रक्कम घेतली. अशा रुग्णाची बिले तहसीलदार यांच्या ऑडिटर टीमला तपासणीसाठी सादर केली नाहीत, यामुळे शेंडगे हॉस्पिटलवर शासकीय कामात अडथळा आणणे आणि साथरोग नियंत्रण कायद्यातील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

लॅब टेक्निशियन बनसोडे यांच्या तक्रारीतील गंभीर आरोप

डॉ शेंडगे रुग्णाचे नाव आणि कोडवर्डच्या खुणा चिट्ठीवर करून द्यायचे, एक बाण, दोन बाण , तीन बाण वरच्या बाजूला असल्यास त्या रुग्णाचे ब्लड रिपोर्ट अहवाल हे वाढवून द्यायचे, आणि खाली बाण केलेला असल्यास त्याचे तपासणी निष्कर्ष कमी द्यायचे असे सांकेतिक भाषेत ठरले होते. प्लस चिन्ह लिहल्यास पॉझिटिव्ह आणि मायनस चिन्ह लिहल्यास निगेटिव्ह असे समजून तसे रिपोर्ट देण्यास मला भाग पाडत असत. या रुग्णालयावर माझी उपजिवीका असल्याने मी हे रुग्णाचे खोटे अहवाल दिले, असं लॅब टेक्निशियन बनसोडेच्या तक्रारीत म्हटलं आहे.

संबंधित बातम्या 

फडणवीस सरकारच्या तुलनेत महाविकासआघाडीच्या काळात महिला अत्याचाराच्या प्रमाणात घट 

Aurangabad lockdown | औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊन, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्णय

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.