मोठी बातमी | आमदारांच्या घरावरून सरकारचं घुमजाव ! घरे देण्याचा निर्णयच झाला नाही.. मंत्री अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
कोट्यवधींचे मालक असलेल्यांना घरे कशासाठी द्यायची, असा संतप्त सवाल नागरिकांमधून तसेच विरोधकांकडू उपस्थित केला जाऊ लागला. मात्र आता अशोक चव्हाणांनी असे वक्तव्य केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या निर्णयावरून घुमजाव केल्याचे बोलले जात आहे.
उस्मानाबाद | कोट्यवधींचे मालक असलेल्या आमदारांना मुंबईत घरे देण्यावरून राजकारण तापले असतानाच सरकारमधीलच महत्त्वाच्या मंत्र्याने या निर्णयबाबत घुमजाव केले आहे. राज्यातील आमदारांना मुंबईत घरे (Houses for MLA) देण्याचा निर्णय झालेला नाही. जो निर्णय झाला नाही, त्याची अंमलबजावणीही होणार नाही, आमदारांनी घरांची मागणी कधी केलीच नाही, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं. उस्मानाबादेत आले असताना टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हा मोठा खुलासा केला आहे. मुळात 300 आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही. भाजपने या विरोधात केलेले आरोप चुकीचे आहे, असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भातील निर्णयाची घोषणा केली होती. त्यानंतर कोट्यवधींचे मालक असलेल्यांना घरे कशासाठी द्यायची, असा संतप्त सवाल नागरिकांमधून तसेच विरोधकांकडू उपस्थित केला जाऊ लागला. मात्र आता अशोक चव्हाणांनी असे वक्तव्य केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या निर्णयावरून घुमजाव केल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज उस्मानाबादेत तुळजापूरच्या देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘ आमदारांना घरे देण्याचा असा कुठलाही निर्णय झाल्याचं मला माहिती नाही. कुणाची मागणीच नव्हती. त्यामुळे त्यावर अंमलबजावणीही केली जाणार नाही. विरोधकांनी यावरून उगाच आरोप केले आहेत. मात्र आमदारांना घरे देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. ‘
अशोक चव्हाणांचे सपत्नीक देवीचे दर्शन
तुळजापूरमध्ये आज सोमवारी सकाळीच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील होत्या. चव्हाण यांनी देवीचे दर्शन घेतले. देवीची आरतीही यावेळी करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यात आमदारांच्या घरांबाबत मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने या निर्णयावरून घुमजाव केले की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
इतर बातम्या-