Osmanabad | तुळजाभवानी मंदिरात पूजाऱ्यांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, नारळ-वीटांनी मारलं
तुळजाभवानी मंदिरासारख्या प्रसिद्ध देवस्थानात पुजाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांशीच असे वर्तन केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर त्वरीत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी व्यवस्थापकांकडून करण्यात येत आहे.
उस्मानाबाद | जिल्ह्यातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात(Tulja bhavani Temple) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील पुजाऱ्यांनीच (Priest in Temple) सुरक्षा रक्षकाला गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोन पुजाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांना (Security Guard) बेदम चोप दिला. मंदिरात भाविकांना दर्शनासाठी सोडण्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचं प्राथमिक चौकशीतून उघड झालं आहे. दोन पुजारी दोन सुरक्षा रक्षकांना मंदिर परीसरातील एका गेटच्या बाहेर मारहाण करतानाची दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहेत. तसेच पुजाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रारही सुरक्षा रक्षकांनी केली असून यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या सुरक्षा रक्षकांना उपचारासाठी सोलापुरात नेण्यात आलं आहे.
नारळ, विटांनी मारहाण
मंदिर परिसरात भाविकांना दर्शनासाठी सोडण्यावरून या वादाला सुरुवात झाल्याची माहिती हाती आली आहे. हे दोन पुजारी सीसीटीव्ही कंट्रोल रुममध्ये गेले. तेथे काही दृश्य त्यांनी पाहिली आणि दोन सुरक्षा रक्षकांशी वाद सुरु झाला. यानंतर या दोन्ही पुजाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांशी वाद घालत त्यांना बाहेर आणले आणि नारळ तसेच वीटांनी मारायला सुरुवात केली. यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. सुरक्षा रक्षक दीपक चौगुले यांना उपचारासाठी सोलापुरात दाखल करण्यात आले आहे.
पुजाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, सुरक्ष रक्षकांनाच अशा प्रकारे मारहाण झाल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तुळजाभवानी मंदिरासारख्या प्रसिद्ध देवस्थानात पुजाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांशीच असे वर्तन केल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर त्वरीत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी व्यवस्थापकांकडून करण्यात येत आहे.
इतर बातम्या-