चंद्रपूर-गडचिरोली वनविभागाची मोठी कारवाई, बावरीया जमातीचे ११ शिकारी ताब्यात

गडचिरोली आणि चंद्रपूर वनकर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. शिकाऱ्यांकडून लोखंडी सापडे, वाघ नखे आणि इतर साहित्य जप्त केले.

चंद्रपूर-गडचिरोली वनविभागाची मोठी कारवाई, बावरीया जमातीचे ११ शिकारी ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 3:47 PM

चंद्रपूर : राज्य वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. हरियाणातील बावरिया जमातीचे ११ शिकारी ताब्यात घेतले आहेत. शिवाय त्यांच्या अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. गडचिरोली शहराजवळील आंबेशिवणी गावात ही कारवाई करण्यात आली. गडचिरोली आणि चंद्रपूर वनकर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. शिकाऱ्यांकडून लोखंडी सापडे, वाघ नखे आणि इतर साहित्य जप्त केले. यामुळे संभाव्य शिकारीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२८ जून २०२३ रोजी गुवाहाटी येथे पोलीस आणि वनविभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाई वाघाच्या शिकार प्रकरणी हरयाणातील बावरीया जमातीचे तीन व्यक्तींना वाघाची कातडी आणि हाडांसह अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने वाघाचे शिकारी सक्रिय असल्याचे सांगितले होते.

वनविभाग आणि पोलिसांची संशयितांवर पाळत

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तीन सदस्यीय पथक गुवाहाटीला गेले होते. शिकारी टोळीतील काही सदस्य गडचिरोली विभागात असल्याची माहिती मिळाली होती. वनविभाग आणि पोलिसांनी संशयितांवर पाळत ठेवली. त्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर वनवृत्त आणि गडचिरोली वनवृत्ताची एक संयुक्त चमू गठीत करण्यात आली.

हे साहित्य करण्यात आले जप्त

रात्री दोन वाजता आंबेशिवणी येथे संशयित ठिकाणी छापा टाकला. कारवाईत झोपड्यामध्ये वाघांच्या शिकारीकरिता वापरण्यात येणारे शिकंजे (६ नग), इतर धारदार शस्त्रे, वाघांची ३ नखे आणि ४६ हजार रुपये जप्त करण्यात आले. सर्व संशयित ६ पुरुष, ५ स्त्रिया आणि ५ लहान मुले यांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले.

चौकशीसाठी स्पेशल टास्क फोर्स

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करीमनगर, तेलंगणा आणि धुळे, महाराष्ट्र येथून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सर्व संशयित हरयाणा आणि पंजाबमधील आहेत. या आरोपींचा देशातील इतर शिकार प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.