Nanded : 14 वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाची आकाशाला गवसणी, आता स्वप्न सत्यात उतरावे
शालेय जीवनात कुणी विचारले तुला काय व्हायचयं तर मुलांच्या तोंडून आपसूकच 'पायलट' हा शब्द जातोच. मात्र, सर्वच मुलांची ही इच्छा पूर्ण होईल असे नाही. पण जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव या गावातील शेतकऱ्याच्या शाळकरी मुलाला अवघ्या 14 व्या वर्षी विमान चालवायची संधी मिळालेली आहे. 14 वर्षीय कृष्णाने हे कर्तुत्व केले आहे. शाळेतील एका उपक्रमाचा भाग असला तरी एवढ्या लहान वयात हवाई सफर करण्याची संधी त्याला मिळाली असून आता त्याचे पायलट होण्याचे स्वप्न सत्यात उतरावे एवढीच इच्छा.
नांदेड : शालेय जीवनात कुणी विचारले तुला काय व्हायचयं तर मुलांच्या तोंडून आपसूकच (Pilot) ‘पायलट’ हा शब्द जातोच. मात्र, सर्वच मुलांची ही इच्छा पूर्ण होईल असे नाही. पण जिल्ह्यातील पिंपळगाव महादेव या गावातील (Farmer Son) शेतकऱ्याच्या शाळकरी मुलाला अवघ्या 14 व्या वर्षी विमान चालवायची संधी मिळालेली आहे. 14 वर्षीय कृष्णाने हे कर्तुत्व केले आहे. (School Programme) शाळेतील एका उपक्रमाचा भाग असला तरी एवढ्या लहान वयात हवाई सफर करण्याची संधी त्याला मिळाली असून आता त्याचे पायलट होण्याचे स्वप्न सत्यात उतरावे एवढीच इच्छा. मात्र, ही इच्छा पूर्ण झाली आहे ती एका विद्यार्थ्याची. नांदेडच्या महात्मा फुले हायस्कुलमध्ये नवव्या वर्गात कृष्णा देशमुख हा चौदा वर्षीय मुलगा शिक्षण घेतोय. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांत संरक्षण दलात भरती होण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी एनसीसीच्या एअर विंगच्या वतीने त्याला विमान चालवण्याची संधी देण्यात आली होती.
उपक्रमाचा काय आहे उद्देश?
‘एनसीसी’ च्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना देशसेवा, राष्ट्रीय भावना व राष्ट्रीय संरक्षण दलामध्ये भरती होण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये कृष्णा देशमुख याने को-पायलट म्हणून विमानाची यशस्वी भरारी घेतली. कृष्णा बरोबर इतर विद्यार्थ्यांना छात्रसेना अधिकारी दत्ता बारसे, रमेश जाधव यांच्यासमवेत पुणे खडकवासला एअर क्राफ्टमध्ये भरारी घेण्याची संधी मिळाली होती.
महत्वकांक्षा वाढली, आता स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न
शाळेच्या या अनोख्या उपक्रमामुळे एका शेतकऱ्याच्या मुलाला विमानातून भरारी मारता आली आहे. भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न आहे. पण त्यापूर्वीच हा अनुभव मिळाल्याने महत्वकंक्षा वाढली आहे. भविष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कृष्णा देशमुख याने सांगितले आहे. शाळेच्या नवनव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे.
संबंधित बातम्या :
राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढणार? बच्चूभाऊ विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश!