नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा, कोंढ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत विमान उडवलं!
कोंढापूरच्या जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने दि. 20 जून रोजी अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली आहे. (14 year old Girl from Kondhapur naned flew a plane America)
नांदेड : कोंढा (ता.अर्धापूर) येथील जोगदंड कुटुंबातील रेवा या चौदा वर्षीय मुलीने दि. 20 जून रोजी अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली आहे. तिच्या या अभिमानास्पद कामगिरीने जोगदंड कुटुंबीयांसह संपूर्ण कोंढेकर ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला आहे. तिच्या भावी कार्यास कोंढेकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (14 year old Girl from Kondhapur naned flew a plane America)
शेतकरी कुटुंबातील मुलीची गगनभरारी
कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे 20 वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी (String Controlled) दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा परिणाम त्यांची मुलगी कु. रेवा दिलीप जोगदंड यांच्या बालमनावर झाला. तेव्हा पासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली आणि हे स्वप्न सत्यात उतरले. रेवा दिलीप जोगदंड (वय 14 वर्षे) हिने 20 जून रोजी चक्क विमान उडवून आकाशात यशस्वी झेप घेतली आहे.
तिच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला. या परिसरातील अनेक सुज्ञान नागरिकांनी रेवाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
शेती, आधुनिक टेक्नॉलॉजी आणि पुढारलेलं गाव म्हणून कोंढा गाव प्रसिद्ध
अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही सुज्ञ कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याच बरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केले जातात. तर येथील काही नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलिकॉप्टर मधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. या शाही विवाह सोहळ्याची प्रसार माध्यमांतून मोठी प्रसिद्धी झाली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते.
मुलीच्या स्वप्नाला आई-वडिलांची साथ
तसेच येथील दिलीप जोगदंड यांची कन्या रेवा दिलीप जोगदंड हिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत पायलट पदासाठी लागणाऱ्या संपूर्ण चाचण्या पार करून दि. 20 जून 2021 रोजी विमानाची यशस्वी भरारी घेऊन आकाशाला गवसणी घातली आहे. या अभिमानास्पद कामगिरीसाठी तिचे वडील दिलीप जोगदंड, आई वंदना दिलिप जोगदंड यांनी तीला सतत प्रोत्साहन दिले.
(14 year old Girl from Kondhapur naned flew a plane America)
हे ही वाचा :
अनलॉक होताच नागवेली पानाची मागणी वाढली, पान विड्याला लाली आली!
धारदार शस्त्राने पत्नीवर वार, पहिल्यांदा बायकोला संपवलं नंतर दारुड्याचा झाडाला गळफास!