Gadchiroli Police | गडचिरोलीत जहाल नक्षल्यांवर 18 लाखांचे बक्षीस; चार जणांना भामरागड पोलिसांकडून अटक

चार जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय. साध्या वेशात, विनाशस्त्र हे नक्षलवादी आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांना अटक केली. चारमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

Gadchiroli Police | गडचिरोलीत जहाल नक्षल्यांवर 18 लाखांचे बक्षीस; चार जणांना भामरागड पोलिसांकडून अटक
भामरागडमध्ये अटक करण्यात आलेले नक्षलवादी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 2:56 PM

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील (Bhamragad Taluka) धोंडराज या गावात एक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या या चार नक्षलवाद्यांची गुप्त माहिती गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल विरोधी पोलीस पथकाला (Anti Naxal Police Squad) लागली. या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पदाचे चार तुकडे धोंडराज परिसरात रवाना करण्यात आले. या चार नक्षलवाद्यांना दोडराज पोलीस (Dodraj Police) स्टेशन परिसरात दोन नक्षलविरोधी पोलीस पथकाने अटक केली. या चार नक्षलवादी एकूण 18 गुन्हे दाखल आहेत. जाळपोळ, हत्या, खून, अपहरण, चकमक असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

अटक केल्यानंतर आरोग्य तपासणी

अटक झालेल्या चार नक्षलवाद्यांना पैकी दोन ACM सदस्य आहेत. दोन सर्वसाधारण सदस्य आहेत. त्यांना अटक केल्यानंतर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आरोग्य तपासणी करून जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. ती सर्व कारवाई गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोठी यशस्वी गडचिरोली पोलीस विभागाला व नक्षलविरोधी पोलीस पथकाला यावेळी मिळालेली आहे.

पळून जाण्याच्या प्रयत्नात होते

चार जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय. साध्या वेशात, विनाशस्त्र हे नक्षलवादी आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांना अटक केली. चारमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दोन जहाल नक्षल्यांवर 14 लाखांचे तर दोघांवर चार लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. गुरुवारी पहाटे नेलगुंडा येथे साध्या वेशात असताना त्यांना अटक करण्यात आली. पोलीस आल्याची चाहूल लागताच हे पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी जेरबंद केले. बापू वड्डे, मारोती गावंडे, बापूची पत्नी सुमन आणि अजित यांना अटक करण्यात आली.

Video Nagpur | समृद्धी महामार्गावरून टीव्ही 9 मराठीची टेस्ट ड्राईव्ह; पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच

Vidarbha Damage | विदर्भात दिवसा पारा, रात्री वारा; वाशिममध्ये आंबा बागेचे, तर गोंदियात भाजीपाल्याचे नुकसान

Video Sanjay Raut | नागपुरात पुढचा महापौर शिवसेनेचा असेल, संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांमध्ये फुंकले प्राण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.