गडचिरोली / इरफान मोहम्मद : गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील मोयबिनबेटा गावात ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने 40 महिला मजुर जखमी झाल्या. मिरची तोडणीचे काम करून परत येत असताना काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. 38 महिला किरकोळ जखमी तर 12 महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर झालेल्या महिलांना तेलंगणा राज्यातील मंचरीयाल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालकाच्या दुर्लक्षतेमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे. सर्व महिला रेगुंटा पिरमिळा गावातून मोबिनपेटा गावाला मिरची तोडणीच्या कामासाठी गेल्या होत्या.
दुर्गम भागातील अनेक छोट्या गावातील मजुर मिरची तोडणीच्या कामासाठी मोठ्या गावात जात असतात. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अहेरी सिरोंचा या भागात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या मिरचीची दुसरी आणि तिसरी तोडणी काही भागात सुरू आहे. रेगुंठा परिसरातील मोयबिनपेटा गावातही मिरची तोडणा सुरू आहे.
मोयबिनपेटा गावात तिरमुडा गावातील काही महिला मजुर मिरची तोडणीच्या कामासाठी काल गेल्या होत्या. मिरची तोडणी करुन काल संध्याकाळी परत येत असताना सदर ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्यामुळे ट्रॉलीत बसलेल्या 40 महिला मजुर जखमी झाल्या. यापैकी 12 महिला गंभीर जखमी आहेत. सिरोंचा तालुक्यात कोणतेही मोठे रुग्णालय नसल्यामुळे तेलंगणा राज्यात गंभीर दुखापत झालेल्या मजुरांवर मोयाबीनपेटा प्राथमिक रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत.