राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’, महिन्याला 5 हजार मिळणार, ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात 'अच्छे दिन', महिन्याला 5 हजार मिळणार, ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 11:44 AM

पंढरपूर :  उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’

कोरोनाकाळात कीर्तने, प्रवचने बंद असल्याने छोट्या मोठ्या कीर्तनकार, प्रवचनकार यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली तर काही जणांना उपासमारीला देखील सामोरं जावं लागलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यात कीर्तनकार-प्रवचनकार दुसरं कोणतं कामंही करु शकत नाही. त्यामुळे त्यांना शासनाकडून मदतीची गरज होती. अखेर ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील कीर्तनकारांना कोरोना काळात ‘अच्छे दिन’ दाखवले आहेत.

थोरात-देशमुखाच्या बैठकीत ठरलं, कीर्तनकार-गायक-वादकांना प्रत्येकी 5 हजार रुपये

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार , प्रवचनकार , गायक, वादक, यांना प्रत्येकी 5 हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहे. यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत हा स्त्युत्य निर्णय घेण्यात आला.

सरकारच्या निर्णयाने कीर्तनकारांना दिलासा

सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आणि योग्य आहे. आम्हाला सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळालेला आहे.राज्यभरात असे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक आहेत, ज्यांची कोरोनाकाळात आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. पण सरकारच्या निर्णयाने त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळालेला आहे, अशी प्रतिक्रिया वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाच्या लाटांवर लाटा

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली. हजारो जणांचे जीव गेले. शासन प्रशासन कोरोनाला अटकाव घालण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. मात्र लोकांनीही शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे आवश्यक बनले आहेत. श्रावण महिना सरलाय. आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. अशा काळात गर्दी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची दाट शक्यता असते. पण अशी गर्दी होऊ नये म्हणून शासन आता निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसंच राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने देखील पुढचे अनेक दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत आहेत.

(5 thousand rupees to be given to kirtankars between Corona period decision of Thackeray government)

हे ही वाचा :

ऑनलाईन दर्शनाचा निर्णय केवळ ‘लालबागच्या राजा’ला की राज्यभरात, विजय वडेट्टीवार म्हणतात…

Ganesh Chaturthi Guidelines 2021 : मंडपात मुखदर्शन नाहीच, राज्य सरकारकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर   

Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या महत्वपूर्ण सूचना, जाणून घ्या एका क्लिकवर

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.