Parbhani | जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर घेण्यात आलेले 74 आक्षेप विभागीय आयुक्तांनी फेटाळले!
विभागीय आयुक्तांनी सर्व आक्षेप अर्जावर सुनावणी केली आणि त्यानंतर केवळ पूर्णा तालुक्यातील नवीन तयार करण्यात आलेल्या खुजडा गटाचा लोकसंख्येनुसार नाव बदलण्याच्या मागणीवर निर्णय देताना त्या गटाचे नाव बदलत बलसा करण्यात आले. मात्र, इतर सर्व आक्षेप फेटाळले.
परभणी : परभणी (Parbhani) जिल्हा परिषदेच्या संभावित प्रभाग रचनेवर घेण्यात आलेले सर्व आक्षेप विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. इतके नाहीतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आलीयं. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक (Election) होण्याचे मार्ग मोकळे झालेत. परभणी जिल्हा परिषदेच्या 60 गट आणि 120 गणांसाठी प्रभाग रचना बनवण्यात आली होती आणि यावर आक्षेप मागवण्यात आले होते . आक्षेप आणि हरकती स्विकारण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत परभणी जिल्हा परिषद प्रभाग रचना विरोधात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे जिल्ह्यातील (Districts) विविध भागातून तब्बल 74 आक्षेप दाखल झाले.
विभागीय आयुक्तांनी सर्व आक्षेप अर्जावर घेतली सुनावणी
विभागीय आयुक्तांनी सर्व आक्षेप अर्जावर सुनावणी केली आणि त्यानंतर केवळ पूर्णा तालुक्यातील नवीन तयार करण्यात आलेल्या खुजडा गटाचा लोकसंख्येनुसार नाव बदलण्याच्या मागणीवर निर्णय देताना त्या गटाचे नाव बदलत बलसा करण्यात आले. मात्र, इतर सर्व आक्षेप फेटाळले. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता मतदार यादी जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनेकांचे राजकिय गणितच बिघडले
एकूणच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभागांची रचना झाल्यानंतर इच्छुक आणि आजी माजी जिल्हा परिषदांचे सदस्य कामाला लागल्याचं चित्र सध्या दिसत आहे. जिल्हा परिषदेसोबतच महापालिकेच्या निवडणूकेच्या निवडणूकाही सोबतच होणार आहेत. विभागीय आयुक्तांनी 74 आक्षेप फेटाळल्याने अनेकांचे राजकिय गणितच बिघडल्याचे बोलले जात आहे. प्रभाग रचनेनंतर काही गटामध्ये आनंदाचे वातावरण देखील बघायला मिळते आहे. इच्छुक आणि प्रस्थापित सर्वच उमेदवार आता कामाला लागले आहेत.