Sangli Suicide : सांगलीतील म्हैसाळमधील सामूहिक आत्महत्या कर्जापोटी, पोलिसांच्या तपासात निष्पन्न

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्ये (Suicide)चे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आल आहे. ही आत्महत्या सावकारी कर्जा (Debt)पोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 13 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. यापैकी अनेक […]

Sangli Suicide : सांगलीतील म्हैसाळमधील सामूहिक आत्महत्या कर्जापोटी, पोलिसांच्या तपासात निष्पन्न
Sangli suicide ground reportImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 4:13 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्ये (Suicide)चे रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आल आहे. ही आत्महत्या सावकारी कर्जा (Debt)पोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 13 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. यापैकी अनेक जणांवर याआधीही गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात असे सांगलीच्या पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. आत्महत्या केलेल्या दोघा भावांच्या खिशात दोन चिट्ठ्या सापडल्या आहेत. त्यामध्ये अनेकांची नावे आहेत. त्यांनी सावकारी कर्ज घेतले आहे. व्यापारासाठी कर्ज घेतले होते असे चिट्ठीमध्ये नमूद आहे.

एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्येने खळबळ

सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे काल एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्हा हादरला होता. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दोन सख्खे भाऊ एक शिक्षक आहे आणि दुसरा पशु वैद्यकीय डॉक्टर या दोन्ही दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी 9 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळजनक माजली. डॉक्टर माणिक वनमोरे दाम्पत्याचा घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या शिक्षकाच्या घरात तीन मृतदेह मिळून आले. या सामूहिक आत्महत्येचा घटनेने संपूर्ण जिल्हा आणि मिरज तालुका हादरून गेला. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

मयताच्या खिशात सापडलेल्या चिट्ठीवरुन आत्महत्येचा खुलासा

सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. याबाबत शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी मयताच्या खिशात चिट्ठी सापडली होती. त्या दिशेने योग्य तो तपास करत याप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. (9 members of the same family in Sangli commit suicide due to debt)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.