चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी शहरात मुलींच्या वसतिगृहात (Girls Hostel) एका युवकाने गोंधळ घातला. या गोंधळ घालणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोंडपिपरी शहरात हे कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात मद्यधुंद अवस्थेत शिरून अखिल ताडशेट्टीवार या तरुणाने गोंधळ घातल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. येथील एका युवतीचा पाठलाग करत आरोपी वसतिगृहात शिरला. शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचा गुन्हा (Chandrapur CRIME) पोलिसांनी अखिलवर दाखल केला आहे.
ही घटना आहे गोंडपिपरी शहरतल्या मुलींच्या वसतिगृहातील रात्रीची वेळ होते. मुली वसतिहात होत्या. तेवढ्यात एक युवक मद्यधुंद अवस्थेत आला. अखिल ताडशेट्टीवार असं या युवकाचं नाव आहे. ही घटना १९ फेब्रुवारीला घडली. परंतु, मुलींनी याची रितसर तक्रार केली नव्हती. एका सामाजिक कार्यकर्त्याने दखल घेतली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. अखिल ताडशेट्टीवार याच्याकडं सुरुवातीला वसतिगृह किरायाणे होते. पण, नंतर ते दुसरीकडं हलवण्यात आले. त्यामुळे अखिलचे नुकसान झाले. महिन्याचा किराया येणे बंद झाले. यातून त्याने ही कृती केल्याची माहिती समोर येत आहे. अखिलने रात्री मद्यधुंद अवस्थेत येत गोंधळ घातला.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यात एक तरुण वसतिगृहात शिरला. त्याची पाऊलं वाकडी चालत आहेत. याचा अर्थ तो मद्यधुंद अवस्थेत असावा. मुली प्रचंड घाबरलेल्या आहेत. तसेच त्यांचा आवाज येत आहे. हा युवक मोबाईलवर बोलताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
वसतिगृहात सुरक्षारक्षक राहतात. मग, या वसतिगृहातील सुरक्षा रक्षक कुठं गेला होता, असा प्रश्न निर्माण होतो. सुरक्षारक्षक सक्रिय राहिला असता तर वेळीच पोलिसांना बोलावले असते. या घटनेमुळं वसतिगृहातील मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनेपासून वसतिगृहातील मुलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तो युवक यानंतर येणार तर नाही. आल्यास पुन्हा भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षरक्षकाच्या मदतीची गरज आहे.