पैशाअभावी शेतकऱ्यानं जीवन संपविलं, शवविच्छेदनासाठी दीड हजार फोन पे घेतले, याला काय म्हणावं?

काल माझ्या पतीनं जीवन संपविलं. प्रशासनाकडून अद्याप कुणी आले नाहीत.

पैशाअभावी शेतकऱ्यानं जीवन संपविलं, शवविच्छेदनासाठी दीड हजार फोन पे घेतले, याला काय म्हणावं?
प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकारImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 5:09 PM

उस्मानाबाद : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरु आहे. कारी येथील लक्ष्मण वाघे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबाने पैसे नसल्याने दिवाळी साजरी केली नाही, हे सांगताना त्यांचे दुःख अनावर झाले. या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी पांगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे पोस्ट मार्टमचे काम करणाऱ्या खासगी व्यक्ती बगाडे याने 2,500 रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचं सांगितल्यानंतर बगाडे यानं 1,500 रुपये फोन पेवर स्वीकारले. पैसे दिल्याशिवाय पोस्ट मार्टम न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

मृतकाचे मुलगा म्हणाला, सोयाबीन सध्या पाण्यात आहे. त्यामुळं तिथून काही उत्पन्न मिळेल, याची शास्वती नाही. दिवाळीला कुणाचीही मदत मिळाली नाही. राज्य सरकारकडून एक रुपयासुद्धा मिळाला नाही. असं म्हणून तो अक्षरशः रडायला लागली. त्याचे अश्रू अनावर झाले होते.

काल माझ्या पतीनं जीवन संपविलं. प्रशासनाकडून अद्याप कुणी आले नाहीत. मृतक लक्ष्मण वाघे यांची पत्नी म्हणाली, बर वाटतं नव्हतं. रानातून घरी आले. लेकरू कर्जबाजारी झालं. सोयाबीन पेरलं ते पाण्यात गेलं.

डॉक्टरांच्याहाताखाली काही खासगी लोकं काम करतात. त्यानं शवविच्छेदनासाठी पैसे मागितले. पैसे घेतल्याशिवाय पीएम करणार नाही, असं संबंधित कर्मचाऱ्यानं सांगितलं. शेवटी अडीच हजार रुपयांऐवजी दीड हजार रुपये त्याला दिल्याचं मृतकाच्या नातेवाईकानं सांगितलं.

शरीर शिवायचं तसंच ठेवलं. त्यानंतर डॉक्टर निघून गेले. रात्री पीएम रुममध्ये थांबून बॅटरी दाखवून पीएम झालेली बॉडी आम्ही शिवायला लावली, असंही मृतकाच्या नातेवाईकानं सांगितलं. मित्रांकडून मागून पैसे जमा केल्याचं नातेवाईक म्हणाले.

पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.