दोघांमध्ये भांडण झाले, एकाने थंड डोक्याने विचार करून दुसऱ्याला बोलावले आणि असा काढला वचपा

रितेशला फोन करून पानठेल्यावर बोलावून घेतलं. रितेश पानठेल्यात गेला. तेव्हा अनिमेशचा सूर बदलला होता. त्याने थेट काठीने मारहाण करायला सुरुवात केली.

दोघांमध्ये भांडण झाले, एकाने थंड डोक्याने विचार करून दुसऱ्याला बोलावले आणि असा काढला वचपा
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 2:02 PM

निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : ही घटना आहे वरोऱ्यातली. रितेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. अनिमेश नावाच्या मित्रासोबत दोन दिवसांपूर्वी त्यांचा वाद झाला. ही गोष्टी रितेश विसरून गेला. पण, अनिमेश सूड घेण्याच्या विचारात होता. त्याने थंड डोक्याने विचार केला. रितेशला फोन करून पानठेल्यावर बोलावून घेतलं. रितेश पानठेल्यात गेला. तेव्हा अनिमेशचा सूर बदलला होता. त्याने थेट काठीने मारहाण करायला सुरुवात केली. यात रितेशचा जागीच मृत्यू झाला. दोस्त दुश्मन झाला. कारण काय तर म्हणे क्षुल्लक गोष्टीवरून झालेला वाद.

काठीने मारहाण केली

जिल्ह्यातील वरोरा शहरालगत असलेल्या फुकटनगर या परिसरात एका युवकाची त्याच्याच मित्राने काठीने मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतक रितेश रामचंद्र लोहकरे (वय २० वर्षे) राहणार विकासनगर वरोरा हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.

VARORA 2 N

हे सुद्धा वाचा

रितेशचा जागेवरच मृत्यू

स्वभावाने शांत असल्याने रितेशचे कुणी शत्रूही नव्हते. मात्र आरोपी अनिमेश संजय रेड्डी (वय २२ वर्षे) राहणार विकासनगर याने फोन करून पानठेल्यावर बोलवून घेतले. दोन दिवसांपूर्वीचा राग काढत काठीने मारहाण करून त्याला जागेवर ठार मारले. यानंतर आरोपी पसार झाला.

आरोपीला नागपुरातून ताब्यात घेतले

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा आणि वरोरा पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला नागपूरवरून ताब्यात घेतले.

दोन दिवसांपूर्वीच्या भांडणाचा वचपा

दोन दिवसापूर्वी दोघांमध्ये भांडण होऊन आज त्याचा वचपा काढण्यात आला. असे प्रथमदर्शनी कारण पोलीस तपासात समोर आले आहे. नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले, हे मात्र कळू शकले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत, असे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.