Nanded Drown Death : गोदावरी नदीत महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेल्या मुलीचा बुडून मृत्यू
महाशिवरात्रीनिमित्त गोदावरी नदीवर भाविक स्नान करण्यासाठी येतात. मयत मुलगीही तिच्या वडिलांसोबत स्नान करण्यासाठी आली होती. मुलगी नदीत अंघोळीसाठी उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. यावेळी तेथे उपस्थित इतर भाविकांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या आणि बाहेर काढले. मात्र तिला पाण्यातून बाहेर काढण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
नांदेड : महाशिवरात्री निमित्त अंघोळीसाठी गेलेल्या मुली (Girl)चा गोदावरी नदीत (Godavari River) बुडून (Drown) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमधील उमरी तालुक्यात घडली आहे. शिरोमणी हणमंत होनशेट्टे (14) असे मयत मुलीचे नाव आहे. मयत मुलगी बेलदरा येथील रहिवासी आहे. सदर मुलगी ही आपल्या वडिलांसोबत महाशिवरात्रीनिमित्त बळेगाव येथील गोदावरी नदीत स्नानासाठी केली होती. मात्र नदीच्या काठावर पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलगी पाण्यात बुडाली. महाशिवरात्री निमित्त गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी अनेक भाविक जमले होते. भाविकांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला. (A girl drowned while bathing in Godavari river in Nanded)
वडिलांसोबत महाशिवरात्रीनिमित्त गोदावरी नदीवर स्नानासाठी गेली होती मुलगी
महाशिवरात्रीनिमित्त गोदावरी नदीवर भाविक स्नान करण्यासाठी येतात. मयत मुलगीही तिच्या वडिलांसोबत स्नान करण्यासाठी आली होती. मुलगी नदीत अंघोळीसाठी उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. यावेळी तेथे उपस्थित इतर भाविकांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या आणि बाहेर काढले. मात्र तिला पाण्यातून बाहेर काढण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. दुपारी उशिराने मुलीच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बेलदरा या गावी आणण्यात आले. गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा होत असल्याने खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे सदरील अपघाती मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बीडमध्ये नदीपात्रात बुडून चार मुलांचा मृत्यू
पोहण्यासाठी नदीत गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी बीडमधील गेवराई तालुक्यातील शहजनापूर चकला येथे घडली आहे. आकाश सोनवणे, गणेश इनकर, बबलू वक्ते, अमोल कोळेकर अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. चारही मुलं पोहण्याचा आनंद घेण्यासाठी सिंदफना नदीपात्रात गेली होती. मात्र नदीतील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चारही अल्पवयीन मुले पाण्यात बुडली. (A girl drowned while bathing in Godavari river in Nanded)
इतर बातम्या
सावधान! आजीबाई लस घेतली का पैसे मिळतात? बँकेत नेले आणि दागिने काढून घेतले
Pune Crime| पुणे हादरलं! चिमुरडीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या