‘अहो… मी बाप गमावला, आता तरी आरोग्य यंत्रणा सुधारा’, वर्ध्यात तरुणीचा आक्रोश

आंदोलन सुरु असताना अचानक एका तरुणीने आंदोलनात माईक हातात घेतला आणि रुग्णालयातील अव्यवस्थेचा पाढाच वाचला. तिने रुग्णालयात झालेल्या त्रासाचे, गैरसोयींचे वाभाडेच काढले.

'अहो... मी बाप गमावला, आता तरी आरोग्य यंत्रणा सुधारा', वर्ध्यात तरुणीचा आक्रोश
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 10:31 PM

वर्धा : कोरोना काळात अनेक रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागला. वर्ध्यातही अशीच परिस्थिती आहे. वर्धा येथे ओबीसी आरक्षणावरुन आंदोलन सुरु असताना अचानक एका तरुणीने आंदोलनात माईक हातात घेतला आणि रुग्णालयातील अव्यवस्थेचा पाढाच वाचला. तिने रुग्णालयात झालेल्या त्रासाचे, गैरसोयींचे वाभाडेच काढले. “मी माझा बाप गमावला, आता तरी आरोग्य यंत्रणा सुधारा. ज्याचं कोणी जवळचं जातं, त्यांनाच हे दुःख माहिती असतं,” अशी भावना या तरुणीने व्यक्त केली. यामुळे वर्ध्यातील सामान्य रुग्णालयाच्या अव्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला जातोय (A girl who lost her father due to corona criticize government health department in Wardha).

“सामान्य रुग्णालयाचा उकीरडा झालाय”

“सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य होत नाही. म्हणून सामान्य रुग्णालयात धाव घेतात. पण, तेथे सोयी-सुविधा नाही. नर्स लक्ष द्यायला तर डॉक्टर तपासायला तयार नाही. सामान्य रुग्णालयाचा उकीरडा झालाय. या व्यवस्थेमुळेच उपचाराअभावी मी माझा बाप गमावला. आता तरी यंत्रणेत सुधारणा करा,” अशी अर्जाव एका युवतीने आंदोलनस्थळी केल्याने सारेच अवाक झाले. या युवतीची ही व्यथा ऐकून अनेकांचे डोळेही डबडबले.

ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात तरुणीकडून आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे

सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केल्यानंतर योग्य औषधोपचार न मिळाल्यामुळे वडील गमावल्याचे शल्य बोचत होतेच. आपल्यावर जो प्रसंग ओढवला तो इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी मनातील खदखद समाजापुढे मांडण्याची भावना उफाळून येत होती. परंतु तशी वेळ व संधी मिळत नसल्याने ती शांत बसली. अखेर आज (2 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन सुरु होते. यावेळी तिने खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगराध्यक्ष आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित असताना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

“वडील एका गोळीसाठी तडफडत होते”

आंदोलनस्थळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन भाषणबाजी सुरु होती. यादरम्यान येथून जाणाऱ्या ‘त्या’ युवतीला भावना व्यक्त करण्याची हीच योग्य संधी असल्याचे लक्षात आले. तीने लगेच आंदोलनस्थळी जाऊन माईक हातात घेतला आणि आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: वाभाडेच काढले. ती म्हणाली, “वडीलांना त्रास होत होता म्हणून सामान्य रुग्णालयात दाखल केले. पण, तेथे त्यांच्यावर उपचार न करता तसेच ठेवले. त्यातच त्यांना डायरिया झाला आणि शरिरात इन्फेक्शन वाढू लागले. वडील एका गोळीसाठी तडफडत होते. पण नर्स म्हणाली; डॉक्टरांना विचारल्या शिवाय देऊ शकत नाही.”

“ऑक्सिजन लावले; पण ते कधी संपले याकडे कर्मचाऱ्यांनाच कल्पना नाही”

“ऑक्सिजन लावले; पण ते कधी संपले, याचीही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कल्पना नव्हती. अखेर नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत खूप उशिर झाला होता. शरिरात इंन्फेक्शन वाढल्याने 8 दिवसाच्या झुंजीनंतर माझा बाप गेला…”, असा सारा घटनाक्रम सांगत असताना ती आपले अश्रू रोखू शकली नाही. तिची ही आपबिती ऐकून आंदोलनस्थळी काही काळ शांतता पसरली होती.

“महामारीत किती संसार उघड्यावर आले, किती जीव गेले याची आकडेवारी जाहीर करा”

अखेर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला बोलणे थांबवायला सांगितले. तिनेही सर्वांची जाहीर माफी मागून ‘मी माझा बाप गमावला, इतरांवर ही वेळ येऊ देऊ नका’ अशी विनंती केली. “ज्यांच्या घरातील व्यक्ती गेला त्यांनाच दु:ख आहे. ज्यांच्या घरात काहीही घडलं नाही, त्यांचं नव्याने जगणं सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच आरोग्य यंत्रणा सुदृढ करा. आरक्षणासाठी आंदोलने होत राहिल, जनगणनाही होणारच पण, या महामारीत किती संसार उघड्यावर आलेत, किती जीव गेलेत, याचीही आकडेवारी जाहीर करावी,” असं आवाहनही या युवतीने केलं.

हेही वाचा :

वडिलांसह सावत्र आईकडून चिमुकल्यांचा छळ, अमानुष मारहाण, निर्दयी आई-वडिलांवर गुन्हा

VIDEO | पॅ-पॅ-पॅ-पॅ, भाजपच्या आंदोलनात वाहतूक कोंडी, त्रस्त चालकांकडून हॉर्नचा गोंगाट

भाजपला मोठं भगदाड, आजी माजी 12 नगरसेवक शिवसेनेत, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

व्हिडीओ पाहा :

A girl who lost her father due to corona criticize government health department in Wardha

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.