Virar Worker Death : विरारमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड मारताना मजुराचा पडून मृत्यू

भिंतीच्या वर सेफ्टी बेल्ट बांधून मजूर काम करीत होता. पण काम सुरू असतानाच त्याचा सेफ्टी बेल्ट तुटल्याने तो सिमेंटच्या रस्त्यावर खाली पडला. यात त्याच्या पायाचे दोन तुकडे होऊन, त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Virar Worker Death : विरारमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड मारताना मजुराचा पडून मृत्यू
विरारमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड मारताना मजुराचा पडून मृत्यूImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 10:50 PM

विरार : तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड मारत असताना सेफ्टी बेल्ट (Safety Belt) तुटून खाली पडल्याने विरारमध्ये एका 29 वर्षीय मजुराचा मृत्यू (Death) झाला आहे. शमशाद अहमद असे मयत मजुराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. या दुर्घटनेत शमशादच्या पायाचे दोन तुकडे होऊन त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. (A laborer died after falling from the third floor while working on a shed in Virar)

सेफ्टी बेल्ट तुटल्याने घडली दुर्घटना

विरार पूर्व चंदनसार परिसरातील HDIL औद्योगिक वसाहतीच्या 15 नंबरच्या इमारतीत आज दुपारी 12 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. बिल्डिंगच्या टेरेसवर यूएसके बालाजी प्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे टेरेसवर पत्रा मारण्याचे काम सुरू होतो. भिंतीच्या वर सेफ्टी बेल्ट बांधून मजूर काम करीत होता. पण काम सुरू असतानाच त्याचा सेफ्टी बेल्ट तुटल्याने तो सिमेंटच्या रस्त्यावर खाली पडला. यात त्याच्या पायाचे दोन तुकडे होऊन, त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सध्या विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

HDIL इंडस्ट्रीजमध्ये शेकडो विविध कंपनी कार्यरत आहेत. तर मोठ्या प्रमाणात नव्या इंडस्ट्रीजचे कामही सुरू आहे. एकीकडे शेकडो कंपनी कार्यरत असताना काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचे मात्र तीन तेरा वाजले आहेत. या मजुरांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे. आता पोलीस, महापालिका आणि कामगार आयुक्त दोषींवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (A laborer died after falling from the third floor while working on a shed in Virar)

इतर बातम्या

Washim Bus Accident : रस्त्यालगतचे लोखंडी कठडे तोडून बस थेट शेतात पटली! थोडक्यात अनर्थ टळला

Kashmir CRPF Attacked: बुरख्यात आली अन् बघता बघता सीआरपीएफच्या कँपवर बाँब टाकून गेली, घटना CCTV मध्ये कैद, पाहा व्हिडीओ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.