Akola : अकोला जिल्हामधील कलंबा येथे शेतशिवारात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
अकोला जिल्हामधील बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथून जवळच असलेल्या कळंबा बु येथे शेतशिवारामध्ये बिबट्या दिसला. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या दिसल्याचे समजताच गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी वनविभागाला यासंदर्भात माहीती दिली.
मुंबई : अकोला (Akola) जिल्हामधील बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथून जवळच असलेल्या कळंबा बु येथे शेतशिवारामध्ये बिबट्या दिसला. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या दिसल्याचे समजताच गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी वनविभागाला यासंदर्भात माहीती दिली. नागरीवस्तीमध्ये बिबट्याचा वावर झाल्यामुळे नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
नेमकं काय घडलं…?
रात्री 11 च्या सुमारास काही मजुरांना बिबट्याचे दर्शन झाले. शेतशिवारात गावठाणचे जेसीबीच्या साहाय्याने काही मजूर खोदकाम करत होते. त्यावेळी या मजूरांना बिबट्या दिसला. विशेष म्हणजे हे मजूर ज्याठिकाणी काम करत होते. त्याला लागूनच असलेल्या शेतामध्ये बिबट्या दिसून आला. या मजुरांनी जेसीबीची काचे बंद करून मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला आणि ग्रामस्तांना याबद्दल माहीती दिली.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
शेतशिवारात बिबट्या असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेतशिवारामध्ये बिबट्या असल्याची माहीती सरपंच महादेव बाजोड व पोलीस पाटील देवीदास फाटे यांनी वनविभागाला दिली. तसेच या परिसरात बिबट असल्याने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
संबंंधित बातम्या :
मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’; रस्त्यावर उतरत केली वाहनांची तपासणी