Kolhapur Crime : धक्कादायक ! कोल्हापूरमध्ये उसने पैसे देत नसल्याच्या रागातून एकाला पेट्रोल टाकून पेटवले
दगडू तकडे कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील रहिवासी आहेत. तर आरोपी कर्नाटकातील रहिवासी आहे. दोघांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. पीडित दगडू तकडे यांनी आरोपी राजू गुरव याच्याकडून काही कामासाठी 80 हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे गुरव परत मागत होता. मात्र वारंवार तगादा लावूनही तकडे हे गुरव याचे पैसे परत करत नव्हते.

कोल्हापूर : उसने घेतलेले पैसे (Money) परत देत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीला पेट्रोल टाकून पेटवल्या (Burn)ची खळबळजनक घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे. दगडू आप्पासाहेब तकडे (50) असे पेटवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेत ते गंभीर भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील आलास येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कर्नाटकातील एका विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू गुरव असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. या घटनेबाबात पोलिस अधिक तपास करीत आहेत. (A man was thrown petrol and set on fire out of anger over non-refund in Kolhapur)
वारंवार तगादा लावूनही पीडिताकडून उसने पैसे परत मिळत नव्हते
दगडू तकडे कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील रहिवासी आहेत. तर आरोपी कर्नाटकातील रहिवासी आहे. दोघांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. पीडित दगडू तकडे यांनी आरोपी राजू गुरव याच्याकडून काही कामासाठी 80 हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे गुरव परत मागत होता. मात्र वारंवार तगादा लावूनही तकडे हे गुरव याचे पैसे परत करत नव्हते. मिरजे उस रोपवाटिकेजवळ शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तकडे आणि गुरव भेटले होते. यावेळी गुरव याने तकडे यांच्याकडे पैशाची मागणी केली. याच कारणातून वाद झाला आणि पैसे परत देत नसल्याने रागाच्या भरात गुरव याने तकडे यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यात तकडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (A man was thrown petrol and set on fire out of anger over non-refund in Kolhapur)