Chandrapur BJP : बल्लारपूरच्या भाजप नेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, संतप्त नागरिकांनी आरोपीला दिला चोप

अल्पवयीन मुलगी कंप्युटर इंस्टिट्यूटमध्ये गेली होती. 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता आरोपी संजय वाजपेयी याने मुलीचा विनयभंग केला. घरी गेल्यानंतर तीनं आपबिती सांगितली.

Chandrapur BJP : बल्लारपूरच्या भाजप नेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, संतप्त नागरिकांनी आरोपीला दिला चोप
बल्लारपूरच्या भाजप नेत्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 6:21 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर (Ballarpur) शहरात भाजपनेत्यावर विनयभंगाचा व पोक्सोचा (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या कंप्यूटर इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याने विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संजय वाजपेयी असे बल्लारपूर भाजपच्या आरोपी शहर सचिवाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर बल्लारपूर पोलीस ठाण्यात संजय वाजपेयी विरोधात छेडछाड व पोक्सोचा गुन्हा दाखल झालाय. घटनेची माहिती कळताच वाजपेयी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन स्थानिकांनी संजय वाजपेयी याची जबर धुलाई केली. या घटनेनंतर बल्लारपूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. बल्लारपूर पोलीस (Ballarpur Police) घटनेचा अधिक तपास करत आहेत.

तक्रारीत नेमकं काय

अल्पवयीन मुलगी कंप्युटर इंस्टिट्यूटमध्ये गेली होती. 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता आरोपी संजय वाजपेयी याने मुलीचा विनयभंग केला. घरी गेल्यानंतर तीनं आपबिती सांगितली. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी बल्लारपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. क्लासरूम, वाजपेयी इंस्टिट्यूट झाशी राणी चौक बल्लारपूर येथे ही विनयभंगाची घटना घडली.

नागरिकांचा संताप

घटनेनंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी कंप्युटर इंस्टिट्यूटवर हल्ला केला. आरोपीला मारहाण करण्यात आली. त्याला शिविगाळ करण्यात आली. या आरोपीनं आणखी काही मुलींचा विनयभंग केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळं पालक सावध झाले आहेत. संजय वाजपेयी हा भाजपचा पदाधिकारी असल्यानं हे प्रकरण तापले आहे. आरोपीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकटी पाहून त्यानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यामुळं पालकावर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आपल्या मुलींना कंप्युटर शिवकविण्याच्या नावाखाली कशाला पाठवायचे असा सवाल ते करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.