Chandrapur Death : चंद्रपूरमध्ये घराच्या अंगणात वीज कोसळली; आईसह दोन मुलींचा मृत्यू
संगीता रामटेके ही महिला मंगळवारी दुपारच्या सुमारास आपल्या दोन्ही मुलींसह घरासमोरील अंगणात बसली होती. यावेळी अंगणात अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे. वीज कोसळल्याने किंवा विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर : घराच्या अंगणात वीज (Lightning) कोसळून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. चंद्रपूर शहरालगत असलेल्या वरवट या गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संगीता रामटेके (40), रागिणी रामटेके (17) व प्राजक्ता रामटेके (14) अशी वीज कोसळून मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. प्राथमिक तपासात वीज कोसळून तिघींचा मृत्यू झाल्याची माहिती असली तरी त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही सस्पेन्स (Suspense) कायम आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संगीता रामटेके ही महिला मंगळवारी दुपारच्या सुमारास आपल्या दोन्ही मुलींसह घरासमोरील अंगणात बसली होती. यावेळी अंगणात अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही सस्पेन्स कायम आहे. वीज कोसळल्याने किंवा विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.
लातूरमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा आणि बैलाचा मृत्यू
लातूर जिल्ह्यातल्या रावणकोळ येथे शेतात वीज पडल्याने एका शेतकऱ्याचा आणि बैलाचा मृत्यू झाला आहे. मारोती वाघमारे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. जळकोट तालुक्यातल्या रावणकोळ येथील मारोती वाघमारे हे शेतकरी आपली बैलजोडी घेऊन शेतीवर गेले होते. वाघमारे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या बैल जोडीतील एक बैलही गतप्राण झाला आहे. शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (A mother and two daughters were killed in a lightning strike in Chandrapur)