अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले बहुपयोगी पेरणी यंत्र; राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक

विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरला लावून ओढता येणार आहे. एक एकर जमिनीत पारंपरिक पध्दतीने लागवड करायची झाल्यास सुमारे दहा हजार इतका खर्च येतो. या यंत्रामुळे एक ते दीड दिवसात काम होते.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले बहुपयोगी पेरणी यंत्र; राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 6:38 PM

मनोज गडेकर, प्रतिनिधी, कोपरगाव (अहमदनगर) : शेतकऱ्यांना पेरणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत कोपरगावमधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी पेरणी यंत्र बनवले. या यंत्राला देशपातळीवर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालाय. मजुरांची कमतरता, वेळेची बचत यासोबत शेतकऱ्यांची खर्चाचीदेखील बचत होणार आहे. देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेती पुरक तयार केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा नुकतीच झाली. ही स्पर्धा सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसई) या जागतिक संस्थेच्या भारतातील एक्सपर्ट इंडिया संस्थेमार्फत राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात घेण्यात आली.

पेरणी यंत्राला अव्वल स्थान

यात कोपरगावमधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित बहुउपयोगी रोप पेरणी यंत्राने अव्वल स्थान पटकावून देश पातळीवर यश मिळवलंय. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 25 जणांच्या टीमने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. एकाच वेळी टोमॅटो, मिरची, वांगी यासह विविध रोपांसाठी दोन सऱ्या पाडून त्या सऱ्यांच्या मधील भरावावर रोपाची लागवड करता येणार आहे. रोपाभोवती मल्चींग पेपर अंथरणे, रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही पसरता येऊ शकते.

NAGAR 2 N

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांचे कौतुक

हे यंत्र तयार करण्यासाठी प्राध्यापक इमरान सय्यद यांनी मार्गदर्शन केले. जागृती भास्कर, निखिल देवकाते या विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केले. हा प्रकल्प करताना विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट घेतले. प्रॅक्टिकल आणि थेरोटीकल याचा मेळ म्हणजेच प्रकल्प असल्याच्या भावना संजीवनी समूहाचे संचालक नितीन कोल्हे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शेतीसाठी केलेल्या बहुपयोगी पेरणी यंत्राच्या निर्मितीबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केलंय.

एका एकराच्या लागवडीसाठी दहा हजारांचा खर्च

संजीवनी शैक्षणिक संस्थेचे संचालक नितीन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरला लावून ओढता येणार आहे. एक एकर जमिनीत पारंपरिक पध्दतीने लागवड करायची झाल्यास सुमारे दहा हजार इतका खर्च येतो. या यंत्रामुळे एक ते दीड दिवसात काम होते. या यंत्रामुळे वेळेची बचत तर होईलच. मात्र एकाच वेळी अनेक कामे होणार असल्याने पैशाची सुद्धा बचत होईल, हे मात्र नक्की.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.