Ahmednagar Drowned : दुर्दैवी! शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा मृत्यू, अमहदनगरमधील हृदयद्रावक घटना

दोघे बहीण-भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहिण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली.

Ahmednagar Drowned : दुर्दैवी! शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा मृत्यू, अमहदनगरमधील हृदयद्रावक घटना
शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 5:43 PM

संगमनेर : कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावा (Sibling)चा शेततळ्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडली आहे. या घटनेमुळे मोठी शोककळा पसरली असून शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा गावा अंतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे रविवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. जयश्री बबन शिंदे (21) आणि आयुष बबन शिंदे (7) अशी या दुर्दैवी बहीण-भावाची नावे आहेत. दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. (A sister and brother drowned in a farm in Ahmednagar)

कशी घडली घटना ?

पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथेबबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहातात. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण-भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहिण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघेही खोल असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडाले.

पिंपळगाव देपा गावावर शोककळा

जयश्री व आयुष हे दोघे बहीण-भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र त्या अगोदरच बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. बहीण-भावाच्या दुर्दैवी मृत्यूने पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे. बहीण-भावाच्या दृर्दैवी मृत्यूने मोधळवाडी, पिंपळगाव देपा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली असून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. (A sister and brother drowned in a farm in Ahmednagar)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.