स्वतःला मृत घोषित करून जिवंत असल्याचा स्टंट, पोलिसांनी असा उधळला कट

| Updated on: Oct 27, 2022 | 9:31 PM

पोलिसांनी वेळीच दखल घेत या घटनेमागची सत्यता समोर आणली.

स्वतःला मृत घोषित करून जिवंत असल्याचा स्टंट, पोलिसांनी असा उधळला कट
पोलिसांनी असा उधळला कट
Image Credit source: tv 9
Follow us on

अकोला : पातूर तालुक्यातील विव्हरा येथील गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला. हा अघोरी कृत्याचा प्रकार चान्नी पोलिसांनी फेटाळून लावला आहे. या घटनेत सदर युवकाचा मृत्यूच झाला नव्हता. तो जिवंत होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं पोलीस म्हणतायत. या युवकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो शारीरिक दृष्टीने सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.

चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील विव्हरा या गावात एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरली. त्याची अंत्यविधीची तयारी सुरू झाली. त्याला तिरडीवर ठेवण्यात आले. त्या युवकाची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. मग अचानक त्या तरुणाला जाग आली. तो तिरडीवरुन उठून बसला. प्रशांत मेसरे असं तरुणाचे नाव आहे.

YouTube video player

पोलिसांनी वेळीच दखल घेत या घटनेत मागची सत्यता समोर आणली. संबंधितांची चौकशी केली. डॉक्टरांनी मृत घोषित न करता किंवा मृत्यू झाल्याचा कुठलाच पुरावा नसतानाही प्रशांत मेसरे मृत झाला असल्याचे का सांगितले गेले.

या घटनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मृत व्यक्ती जिवंत करुन दाखवा आणि 25 लाख घेऊन जा” असे आव्हान अनिसचे प्रदेश प्रवक्ता पुरषोत्तम आवारे यांनी केले आहे.

प्रशांत मेसरे हा होमगार्डमध्ये आहे. या युवकाची तब्येत बरी नव्हती. त्याला बुलढाणा जिल्हातल्या खामगाव येथे चक्कर आला होता. तेव्हा त्याला खामगाव येथील रुग्णालयात दाखविण्यात आले. त्याची तब्बेत ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरने पोलिसांना दिली.

या घटनेत भोंदूबाबाची चर्चाही रंगत आहे. मात्र अंगात कुठल्याही प्रकारची दैवीशक्ती नाही. केवळ लोकांमध्ये अफवा व भीती निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले. असा दावा पोलिसांनी केलाय.