दहावी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेली, त्यानंतर घडली ही धक्कादायक घटना

एकीकडे दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद तर दुसरीकडे घडलेला धक्कादायक प्रसंग यामुळे ती हादरली होती. कुटुंबीयांना पोलिसांत जाऊन तक्रार केली.

दहावी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेली, त्यानंतर घडली ही धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 7:58 PM

प्रतिनिधी, गडचिरोली : दहावी झाल्याने ती आनंदित होती. प्रमाणपत्र घेण्यासाठी म्हणून शाळेत गेली. पण, घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती भेदरलेल्या अवस्थेत गावी परतली. रात्री घडलेला प्रसंग तिने कुटुंबीयांना सांगितला. तेव्हा कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. एकीकडे दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद तर दुसरीकडे घडलेला धक्कादायक प्रसंग यामुळे ती हादरली होती. कुटुंबीयांना पोलिसांत जाऊन तक्रार केली.

विद्यार्थिनीला बळजबरी पाजली दारू

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी विद्यार्थिनी शाळेत गेली होती. त्यानंतर निहाल कुंभारे याने तिला एका खोलीवर नेले. संध्याकाळी रोशन गोडसेलवार आणि निहाल कुंभारे यांनी त्या मुलीला बळजबरीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला.

हे सुद्धा वाचा

पहाटे चौकात सोडून दिले

त्यानंतर पहाटे तिला येथील चौकात सोडून दिले. भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्यावरील अत्याचाराची जोरजोरात वाच्यता केली. त्यानंतर ती आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना घटना सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.

पोलिसांनी पीडितेचे जबाब नोंदवून तपास अहेरी पोलिसांकडे वर्ग केला. रविवारी रात्री उशिरा अहेरी पोलिसांनी आरोपी रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

दोन्ही युवकांना अटक

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी दोन्ही युवकांना अटक केली आहे. रोशन गोडसेलवार (वय २३) रा. आलापल्ली आणि निहाल कुंभारे (वय २४) रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली, अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी एका शाळेत शिकत होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.