Chandrapur Youth Death : वैनगंगा नदीत अंघोळीला गेला अन् बुडून मेला, चंद्रपूरमध्ये तरुणाचा मृत्यू

अभिनव कुथे हा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी - आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात आईसह गेला होता. यावेळी त्याची आईही नदीपात्रात थोड्या पाण्यात उभी होती तर अभिनव पाण्यात अंघोळीसाठी उतरला. गेले दोन दिवस वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिनव काही क्षणातच वैनगंगा नदी पात्रात दिसेनासा झाला.

Chandrapur Youth Death : वैनगंगा नदीत अंघोळीला गेला अन् बुडून मेला, चंद्रपूरमध्ये तरुणाचा मृत्यू
गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या मुलीचा बुडून मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 10:24 PM

चंद्रपूर : आंघोळ करायला जाणे एका युवकांच्या जीवावर बेतले. चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी शहरालगत वैनगंगा (Wainganga) नदीपात्रात बुडून तरुणा (Youth)चा दुर्दैवी मृत्यू झाला. अभिनव दौलतराव कुथे (23) असे मयत युवकाचे नाव असून तो गडचिरोलीच्या आरमोरी येथील रहिवासी आहे. अभिनव आपल्या आईसोबत नदीपात्रात गेला होता. यावेळी पोहण्यासाठी अभिनव नदीपात्रात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अभिनव पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यंत्रणांनी प्राथमिक शोध मोहीम सुरू केली. अद्याप अभिनव सापडला नाही. (A young man drowned while bathing in Wainganga river in Chandrapur)

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला

अभिनव कुथे हा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी – आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात आईसह गेला होता. यावेळी त्याची आईही नदीपात्रात थोड्या पाण्यात उभी होती तर अभिनव पाण्यात अंघोळीसाठी उतरला. गेले दोन दिवस वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिनव काही क्षणातच वैनगंगा नदी पात्रात दिसेनासा झाला. अभिनव बुडाल्याचे लक्षात येताच तात्काळ पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरु केली.

मुंबईत वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेले दोन तरुण तलावात बुडाले

मुंबईतील कांदिवली पश्चिम चारकोप येथील श्री डिंगेश्वर तलावाजवळ वाढदिवसाची पार्टी करत असलेले दोन तरुण अचानक पाण्यात गेले आणि बुडाले. त्यापैकी एका तरुणाला वाचवण्यात यश आले तर दुसरा बुडाला. रविवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून चार तरुण तलावाजवळ पार्टी करत होते. तेव्हा एक तरुण पाण्यात गेला, त्याला पाण्यात बुडताना पाहून दुसरा तरुण त्याला वाचवण्यासाठी गेला, तोही बुडू लागला. मात्र त्याला वाचवण्यास यश आले. (A young man drowned while bathing in Wainganga river in Chandrapur)

इतर बातम्या

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये माजी सैनिकाच्या घरी चोरी; सोन्याच्या दागिन्यांसह रिव्हॉल्वर चोरले

Nagpur Crime : नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी, अशी फसली पोलिसांच्या जाळ्यात

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.