आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अ‌ॅलर्ट, विठ्ठल मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या 145 कर्मचारी ,सद्स्य ,पुजारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येथील अशानाच मंदिरात प्रवेश मिळणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यानी दिली.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अ‌ॅलर्ट, विठ्ठल मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
कोरोना चाचणी
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 1:16 PM

सोलापूर: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी सलग दुसऱ्या वर्षी निर्बंधांसह साजरी होणार आहे. 20 तारखेला आषाढी एकादशीनिमित्त मानाच्या दहा पालख्या शिवशाही बसेसद्वारे पंढपरपूरला पोहोचणार आहेत. पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक होणार आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या 145 कर्मचारी ,सद्स्य ,पुजारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे

अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच प्रवेश

आज कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येतील त्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल.  145  पैकी ज्यांचे अहवाल निगेटिव्ह येथील अशानाच मंदिरात प्रवेश मिळणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यानी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मंदिरामध्ये सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला काही मोजके पुजारी व मंदिर समितीच्या सदस्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान कोरोनाचा कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी मंदिर समितीने कोरोनाचे सर्व नियम पाळून काही निर्बंध घातले आहेत. याचाच एक भाग म्हणून मंदिरातील सर्व 145 कर्मचाऱ्यांसह अधिकारी व मंदिर समितीच्या सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

20 वर्षांच्या विठ्ठल सेवेचं फळ

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Pandharpur | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील 9 गावांमध्ये संचारबंदी लागू

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे रवाना होणार: अनिल परब

Aashadhi Ekadashi 2021 Pandharpur temple 145 members corona test conducted by health department

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.