Abdul Sattar : सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने आला तर वेल अँड गुड, नाही तर … अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल कसा येईल माहीत नाही. अंतिम सुनावणी झाली आहे. कोर्ट जी ऑर्डर देईल ती सर्वांना मान्य करावी लागेल. आमच्या बाजूने आला तर वेल अँड गुड. नाही आला तर तोही निकाल मान्य करावा लागेल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

Abdul Sattar : सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने आला तर वेल अँड गुड, नाही तर ... अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 7:41 AM

सातारा : राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक भागात संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे स्वत: शेतीची पाहणी करत आहेत. नुकसानीचा आढावा घेत आहेत. राज्यात पावसाच्या रुपाने चौथी आपत्ती आली आहे. पण शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही, असं सांगतानाच आतापर्यंत 83 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. सत्तार हे साताऱ्यात शेतीची पाहणी करत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालंय. आम्ही बांधावर जाऊन माहिती घेतोय. बाधित शेतकऱ्यांना पंचनामे आले की मदत देण्यात येईल. संभाजी नगरात 6 हजार तर मराठवाड्यात 11 हजार तर राज्यात 43 हजार हेक्टरवर शेतीचं नुकसान झाले आहे, अशी आकडेवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केली. पीक विमा कंपन्या आणि माझी पाच वेळ बैठक झाली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना भरपाई मिळतेय. जे राहिले आहे त्यांनाही मिळेल. जे पीक खराब झाले त्याची नुकसान भरपाई मिळेल, अशी ग्वाहीही अब्दुल सत्तार यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

मदतीचा निर्णय 10 दिवसात

सरकारने शेतकऱ्यांना याआधीही मदत केली आहे. आताही शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. म्हणूनच तंतोतंत माहिती घेणं सुरु आहे. सतत पावसाने नुकसान होत आहे. पावसाच्या रुपात ही चौथी आपत्ती आहे. नुकसान झालेला शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही. सध्या 83 टक्के पंचनामे झाले आहेत, उरलेले सुद्धा लवकरच होईल, असं सांगतानाच येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांच्या मदतीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं सत्तार यांनी सांगितलं.

नव्या पुड्या

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपाची समाचार घेतला. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आता त्यांना शहाणपणा सूचत आहे. नव्या पुड्या सोडून संभ्रम निर्माण केला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी असं बोलायला नको होतं. वरिष्ठ कोणी बोललं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण आदित्य खूप लहान आहेत. त्यांचं जेवढं वय आहे, तेवढी शिंदे यांची राजकीय कारकिर्द आहे, असा टोला त्यांनी लगावला.

जो निकाल येईल तो मान्य

ईडीने जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीने अजित पवार यांना क्लिनचीट दिली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. सुप्रीम कोर्टाचा जो ही निकाल येईल तो मान्यच करावा लागतो, जे येईल ते आम्हीही मान्य करू, असं ते म्हणाले.

वेल अँड गुड

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल कसा येईल माहीत नाही. अंतिम सुनावणी झाली आहे. कोर्ट जी ऑर्डर देईल ती सर्वांना मान्य करावी लागेल. आमच्या बाजूने आला तर वेल अँड गुड. नाही आला तर तोही निकाल मान्य करावा लागेल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.