कुटुंबासोबत पन्हाळगडावर फिरायला आला होता चिमुकला, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते !

भुदरगड येथील एक कुटुंब मित्रपरिवारासह पन्हाळगडावर पिकनिकसाठी आले होते. पन्हाळगडावरील तबक उद्यानाजवळ सर्वजण चहा पिण्यासाठी टपरीवर थांबले आणि इथेच घात झाला.

कुटुंबासोबत पन्हाळगडावर फिरायला आला होता चिमुकला, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते !
पन्हाळगडावर दोन वर्षाच्या मुलाचा अपघाती मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 9:30 PM

कोल्हापूर / भूषण पाटील : कुटुंबासोबत पन्हाळगडावर पिकनिकसाठी आलेल्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पन्हाळगडावरील तबक उद्यानाजवळ आज दुपारी तीन वाजता ही घटना घडली. रस्ता ओलांडून पलीकडे उभ्या असलेल्या आजोबांकडे जात असताना त्याचा अपघात घडला. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पीडित कुटुंब भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील रहिवासी असून, पन्हाळगडावर फिरायला आले होते. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

रस्ता ओलांडताना कारच्या चाकाखाली आला मुलगा

भुदरगड येथील कुटुंब आपल्या मित्रपरिवारासह ज्योतिबाहून पन्हाळा पाहण्यासाठी आले होते. यावेळी सज्जाकोटी पाहण्यासाठी जात असताना ते तबक उद्यानासमोर एका चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबले होते. यावेळी सर्वजण फोटो काढण्यात गुंतले होते. यावेळी दोन वर्षाचा चिमुरडा आईचा हात सोडून रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या आजोबांकडे जाण्यासाठी धावला. याचदरम्यान रस्ता ओलांडताना सज्जाकोटीकडून येणाऱ्या भरधाव कारच्या चाकाखाली आला.

रुग्णवाहिकेअभावी रुग्णालयात नेण्यास एक तास उशिर

गंभीर जखमी मुलाला स्थानिकांच्या मदतीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक नसल्याने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली. यामध्ये एक तासाचा वेळ गेला. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातून मुलाला कोल्हापूर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तबक उद्यानाजवळील गर्दी, रस्त्यावरील अतिक्रमण आणि वाहतुकीचा बेशिस्तपणा यामुळे वारंवार असे अपघात होत असतात.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.