Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी

नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील एका लॉजवर 2017 साली ही घटना घडली होती. या घटनेत आरोपी विकास लांजेवारने प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाला एका लॉजवर नेले. तेथे त्याला दारू पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर बालकाला जबर मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.

Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी
चंद्रपूरमधील तरुणीच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी गजाआडImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 4:28 PM

नांदेड : प्रेयसीच्या मुलाची निर्घृणपणे हत्या (Murder) करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा (Sentence) नांदेडच्या न्यायालयाने सुनावली आहे. विकास लांजेवार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. आरोपीने अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलाला दारु पाजून बेशुद्ध केले आणि नंतर जबर मारहाण केली होती. या मारहाणीत पीडित बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी प्रेयसीने माहुर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी आज नांदेड न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंड सुनावला. (Accused of killing girlfriend’s son in immoral relationship sentenced to 10 years in prison)

2017 मध्ये आरोपीने केली होती बालकाची हत्या

आरोपी विकास लांजेवारचे मयत बालकाच्या आईसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. याच संबंधातून आरोपीने बालकाचा काटा काढला. नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील एका लॉजवर 2017 साली ही घटना घडली होती. या घटनेत आरोपी विकास लांजेवारने प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाला एका लॉजवर नेले. तेथे त्याला दारू पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर बालकाला जबर मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बालकाच्या आईच्या तक्रारीवरून माहुर पोलिसांनी गुन्हा दाखल करत नांदेड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणी साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपीला 50 हजारांचा दंड आणि 10 वर्षे सक्तमजुरी अशी दुहेरी शिक्षा सुनावली आहे. (Accused of killing girlfriend’s son in immoral relationship sentenced to 10 years in prison)

इतर बातम्या

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

Dhule Fire : धुळ्यात झोपडी जळाल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा होरपळून मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.