सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी, पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, लाखाहून अधिक दंड वसूल

प्रसिद्ध असलेला सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत. | Sada Waghapur Waterfall Tourists

सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी, पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये, लाखाहून अधिक दंड वसूल
साताऱ्याच्या सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतान दिसून येत आहेत. अशा पर्यटकांविरोधात सातारा पोलिसांनी कारवाई केली.
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 1:50 PM

सातारा : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी शासन-प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतंय. याच अनुषंगाने शासनाने कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत. त्यानुसार पर्यटन स्थळी जाण्यास बंदीच घालण्यात आली आहे. मात्र तरीही काही पर्यटक शासनाचा आदेश पायदळी तुडवून पर्यटन स्थळांवर गर्दी करताना दिसून येतात. साताऱ्याच्या सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी केलीय. गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

1 लाखाहून अधिक दंड वसूल, पाटण पोलिसांनी कारवाई

साताऱ्याच्या सडावाघापुर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी अद्दल घडवली. पर्यटकांकडून आर्थिक स्वरुपाचा दंड वसूल केला गेला. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय.

सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

प्रसिद्ध असलेला सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली असताना देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळावर येत असल्याने पाटण पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पावसाळ्याच्या हंगामात 500 पर्यटकांवर कारवाई केली असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.

वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग आक्रमक

दुसरीकडे वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे साताऱ्याच्या महाबळेश्वर आणि पाचगणीमधील दुकानदारांनी-व्यापाऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केलाय. ‘महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध ह़टवा, आम्हाला जगू द्या. कोरोना आणि लॉकडाऊनने आम्ही उध्वस्त झालोय. पण आता परिस्थिती पूर्ववत होत असताना आमचाही विचार करा. आमचे व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी द्या’, असं साकडं महाबळेश्वर, पाचगणीमधल्या व्यापाऱ्यांनी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घातलं.

(Action against Sada Waghapur Waterfall Tourists by Satara Patan Police)

हे ही वाचा :

‘महाबळेश्वर, पाचगणीमधले निर्बंध हटवा, आम्हाला जगू द्या’, व्यापाऱ्यांचं पालकमंत्री बाळासाहेब पाटलांना साकडं

ईडीची नोटीस का आली? जरंडेश्वरला किती कर्ज दिलं? सातारा जिल्हा बँकेचा महत्वाचा खुलासा

लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?.
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?.
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.