अदानीचं विमान फिरायला चालतं, मग प्रकल्प का नको?, सरकारमधील बड्या मंत्र्याने उद्धव ठाकरे यांना घेरले

Udhav Thackeray | काही लोकं जामनगर येथील लग्नाला जातात. त्यासाठी अदानीचे विमान फिरायला चालतं, अदानीचे विमान जामगरला जायला चालते. पण कोकणात अदानीचा प्रकल्प चालत नाही, असा हल्लाबोल शिंदे सरकारमधील एका मंत्र्यांने उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

अदानीचं विमान फिरायला चालतं, मग प्रकल्प का नको?, सरकारमधील बड्या मंत्र्याने उद्धव ठाकरे यांना घेरले
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 10:06 AM

मनोज लेले, प्रतिनिधी रत्नागिरी | 8 March 2024 : उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. जामनगरमधील लग्नासाठी काही लोकं दोन वाजता लँड झाली. ते विमान अदानीचे होते, अंबानीचे नव्हते. अदानीचे विमान फिरायला चालतं, अदानीचे विमान जामगरला जायला चालते. पण प्रकल्प अदानींनी करू नये अशा प्रकारची वाईट राजकीय प्रवृत्ती वाढत आहे. या प्रवृत्तीमुळे आपणा सर्वांचा तोटा होत असल्याची टीका सामंत यांनी केली. या

रिफायनरीबाबत सरकारची भूमिका

रिफायनरी करायची कि नाही याचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.मात्र तिथल्या जनतेला विचारल्याशिवाय सरकार एक पाऊल पुढे जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. नाणार इथं प्रकल्प नको बारसू इथं रिफायनरी प्रकल्प करा असं पत्र माजी मुख्यमंत्री यांनी दिल्याचे सांगत, त्यांनी ठाकरे यांना घेरले.नाणार इथं प्रकल्पाला विरोध करायचा आणि अराम्को कंपनीला इथं प्रकल्प करा असे पत्र द्यायचे.इथं कातळ आहे त्यामुळे इथं प्रकल्प होवू शकतो, रिफायनरी प्रकल्पामुळे आर्थिक परिस्थितीत बदल होवू शकतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे राजकारण किती करायचे याला मर्यादा हव्यात, अशी भूमिका त्यांनी घेतली.

हे सुद्धा वाचा

राजकीय पक्षांना आवाहन

दरम्यान बारसू रिफायनरी विरोधातील संघटनेने लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात या प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेण्याचे आवाहन महाविकास आघाडीला केले आहे. महाविकास आघाडीने याविषयीचा अजेंडा मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नाही तर उमेदवार उभा करणार

जो पक्ष बारसू रिफायनरीविरोधात उभा ठाकेल. तसेच जाहीरनाम्यात स्पष्ट करेल. त्याला पाठिंबा देण्याची भूमिका घेणार आहे. नाहीतर बारसू रिफायनरी विरोधी संघटना आपला उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

असा आहे वाद

कोकणातील राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यानंतर बारसू येथील सोलगाव परिसात क्रूड ऑईल रिफायनिंग प्रकल्प प्रस्तावित आहे. आरामको या सौदी अरेबियातील तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीसोबत सरकारी कंपन्या हा प्रकल्प उभा करणार आहे. 13 हजार एकर जागेवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला स्थानिकांचा विरोध आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.