Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidarbha Fire| विदर्भात आगडोंब; अकोला, यवतमाळ, वाशिममध्ये आगीच्या घटना, अकोला जगातील हॉट शहर

अकोला : अकोल्यात गोदामाला आग लागून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातील मालेगावात सिलिंडरचा स्फोट होऊन घर जळून खाक झालं. तर यवतमाळ जिल्ह्यात शहरातील मुख्य बाजारपेठेतील गोदामाला आग लागली. दुसरीकंड तापमानाच्या पाऱ्यानंही कहर केलाय. अकोल्यात आज जगातील सर्वाधिक हॉट शहर म्हणून नोंद झाली.

Vidarbha Fire| विदर्भात आगडोंब; अकोला, यवतमाळ, वाशिममध्ये आगीच्या घटना, अकोला जगातील हॉट शहर
अकोला येथे गोदामाला लागलेली आग. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 4:59 PM

अकोला : तापमानाच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहणारे अकोला पुन्हा आता चर्चेत आलं आहे. अकोला जगातील सर्वाधिक हॉट शहर ठरले आहे. अकोल्यात देशात सर्वाधिक म्हणजेच 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक तापमान असणाऱ्या जगातील शहरांमध्ये अकोल्याचा पहिला क्रमांक आला आहे. हवामान अभ्यासकांकडून उष्णतेच्या लाटेची (heat wave) शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. दुपारी रस्ते सुमसाम झाले. या उन्हामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. उष्माघाताचा धोका (heatstroke threat) वाढल्याने अतिजोखमीतील कारणांमुळे नागरिकांना सुरक्षात्मक खबरदारी योजना घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशातच जुने शहर पोलीस (Old City Police) हद्दीत आग लागून गोदामाचे फार मोठे नुकसान झाले. अहमद नौशाद यांच्या गोदामाला आग लागली.

वाशिममध्ये तीन घरं जळून खाक

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात, सावरकर प्लॉटमध्ये राहणाऱ्या सलीम खान पठाण यांच्या घराला वाढत्या तापमानामुळे आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. त्यानंतर त्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की त्यामुळे या घराच्या बाजूला असणारे शाहिदाबी नूर खान, अताउल्ला खान यांच्याही घराला आग लागली. हे तीनही घरं पूर्णपणे जळून खाक झालेत. या आगीत घर संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचं नुकसान झालं आहे. महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यवतमाळात फोम हाऊसच्या गोदामाला आग

यवतमाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील चिंतामणी कॉम्प्लेक्समधील फोम हाऊसच्या गोदामाला आग लागली. आगीत दुकान जळून खाक झाले. दुकानातील फोम, सोफासेट साहित्य होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी बोलाविण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

Nagpur Yuva Sena | नागपुरात वरुण सरदेसाईंनी फुंकले युवा सेनेत प्राण, विद्यापीठातील सिनेट निवडणुकांचं दिलं टार्गेट

Nagpur Petrol | 50 रुपयांपेक्षा कमी पेट्रोल मिळणार नाही! नागपुरातील पेट्रोल पंपावर लागल्या पाट्या

Photo Amravati accident | अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; 1 ठार, 24 जखमी, 6 गंभीर

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.