Chandrapur water yoga : वय वर्षे 85, 37 प्रकारच्या जल योगासनांचं 37 मिनिटात सादरीकरण, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

कृष्णाची नागपुरे हे तरुणांनाही लाजविणारे आहेत. त्यांचं वय सध्या 85 वर्षे आहे. तरीही ते पाण्यात पोहतात. नुसते पोहतच नाहीत. तर पाण्यात ते सहज बराच वेळ काढू शकतात.

Chandrapur water yoga : वय वर्षे 85, 37 प्रकारच्या जल योगासनांचं 37 मिनिटात सादरीकरण, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद
वय वर्षे 85, 37 प्रकारच्या जल योगासनांचं 37 मिनिटात सादरीकरण
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 5:35 PM

चंद्रपूर : येथील प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे (Krishnaji Nagpure) यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये (India Book of Records) नोंद करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा स्टेडियम (District Sports Stadium) चंद्रपूर येथील जलतरण तलावात आज त्यांनी या जलयोगाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यामुळे कृष्णाजी नागपुरे हे जलयोग करणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती झाले आहेत. नागपुरे यांचं वय 85 वर्ष असून गेल्या 70 वर्षांपासून ते जलयोग प्रसाराचं काम करताहेत. आज त्यांनी 37 प्रकारच्या योगासनांचं आणि योगमुद्रांचं 37 मिनिटात सादरीकरण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये या अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

योगासन करणारे सर्वात जास्त वयाचे व्यक्ती

कृष्णाची नागपुरे हे तरुणांनाही लाजविणारे आहेत. त्यांचं वय सध्या 85 वर्षे आहे. तरीही ते पाण्यात पोहतात. नुसते पोहतच नाहीत. तर पाण्यात ते सहज बराच वेळ काढू शकतात. या उतरत्या वयात त्यांनी 37 मिनिटे पाण्यात राहून 37 प्रकारची योगासनं केलीत. याची नोंदही घेण्यात आली. इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. अशाप्रकारची योगासन करणारे ते सर्वात जास्त वयाचे व्यक्ती ठरलेत.

पाण्यात जलयोग

21 जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. चंद्रपुरातील कृष्णाजी नागपुरे यांनी जलतरण तलावात योगसाधना केली. हे सर्वांच आकर्षण ठरलं होतं. जलतरण तलावातल्या पाण्यावर श्वास आणि लयबद्दता सांभाळून त्यांनी 20 प्रकारची योगासन केली होती. पाण्यात हालचाल करत असताना दोन्ही हात पाठीमागे घेऊन उंदीर चाल, बदकचाल, खडीचाल असा काही जलतरणाचे प्रकार आहे. त्यानंतर जागेवर फिरणं, पद्मासन, शवासन, नमस्कार करणं, हे सारं ते पाण्यात सहज करतात. पाण्यात पद्मासन करताना आधार राहत नाही. वयाच्या 85 व्या वर्षी पाण्यात योगासनं करून त्यांनी आदर्श निर्माण केला.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.