Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल वादळ पुन्हा एकदा रस्त्यावर; आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला

या मोर्चामध्ये सहभाग घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी, कामगार आणि महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या मोर्चाद्वारे हे आंदोलन चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

लाल वादळ पुन्हा एकदा रस्त्यावर; आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 5:18 PM

अकोले / अहमदनगर : राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके संपूर्णपणे बरबाद झाली आहेत. त्यामुळे सरकारने या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र कोणतीही मदत करण्यात आली नाही. वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, वरकस, आकारीपड, गायरान व घरांच्या तळ जमिनी, नावे करण्याची वारंवार आश्वासनंही दिली गेली. मात्र प्रत्यक्षात जमीन नावे करण्याऐवजी पोलीस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत.

जबरदस्तीने व अत्यल्प मोबदला देत शेतकऱ्यांच्या जमिनी, रस्ते, कॉरिडोर, विमानतळ व तथाकथित विकासकामांसाठी  हडप केल्या जात आहेत.

कोविड संकटात 17 रुपये लिटरप्रमाणे दूध विकावे लागल्याने हतबल झालेल्या दूध उत्पादक आता थोडे व्यवसायात पुन्हा उभे राहू लागले असताना, पुन्हा एकदा केंद्र सरकारने दुग्धपदार्थ आयात करण्याच्या हालचाली सुरू करून दुग्ध उत्पादकांचे जीणे हैराण केले आहे.

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा, सुपरवायझर, आहार कर्मचारी, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, घरेलू कामगार  त्यांचे  प्रश्न तीव्र झाल्याने हैराण झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यासारख्या पिकांना रास्त भावाची हमी, दुग्धपदार्थ आयात करून दुधाचे भाव पाडण्यास विरोध, जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला, शेतकऱ्यांना व निराधारांना पेंशन, सर्वांना घरकुले, कर्ज व वीजबिल माफी, शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम व घरकुल तसेच आशा कर्मचारी, आशा सुपरवायझर, अंगणवाडी ताई, पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ स्री परिचर, घरेलू कामगार यांचे प्रश्न घेऊन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा भव्य राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे.

या मोर्चामध्ये सहभाग घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी, कामगार आणि महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या मोर्चाद्वारे हे आंदोलन चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.