Bhandardara | भंडारदरा धरणातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला!

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विज निर्मीतीसाठी 832, व्हॉल्वद्वारे 289 आणि सांडव्यातून 1218 असा एकूण 2339 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात 90 दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले.

Bhandardara | भंडारदरा धरणातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 11:02 AM

भंडारदरा : भंडारदरा (Bhandardara) पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यात येत आहे. 3500 क्युसेक वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. हे पाणी प्रवरा नदीत (Pravara River) सोडण्यात आले आहे. यामुळे अत्यंत मनमोहक असा नजारा पहायला मिळतोयं. धरणातील पाणीसाठा 85 टक्के झाला असून पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास विसर्ग अजून वाढविण्याची होण्याची शक्यता देखील आहे. भंडारदरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Heavy rain) हजेरी लावलीयं.

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पाणी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विज निर्मीतीसाठी 832, व्हॉल्वद्वारे 289 आणि सांडव्यातून 1218 असा एकूण 2339 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दिवसभरात 90 दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले. हे पाणी खाली निळवंडे धरणात जमा होत आहे. त्यामुळे निळवडे 80 टक्के भरले आहे. एकंदरीतच काय तर चांगल्या पावसामुळे यंदा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसते आहे.

हे सुद्धा वाचा

भंडारदरा धरण 85.84 टक्के भरले

जिल्हात आतापर्यंत भंडारदरा 62, 2176 मिमी, घाटघर 86, 3002 मिमी, रतनवाडी 82, 3113 मिमी, पांजरे – N.R 655 मिमी, वाकी 49, 1703 मिमी, निळवंडे 06, 801 मिमी, आधला 216 मिमी, अकोले 03, 394 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीयं. तर अहमदनगर जिल्हयातील तीन महत्वाच्या धरणातील सध्याची पाणीपातळी भंडारदरा 85.84 टक्के, निळवंडे 81.67 टक्के, मुळा धरण 65 टक्के आहेत. म्हणजेच काय तर अहमदनगर जिल्हयातील महत्वाची तीनही धरणे चांगल्या स्थितीमध्ये असल्याने अहमदनगरकरांना नो टेन्शन आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.