Ahmednagar | काझी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेची प्रसूती, डाॅक्टरांच्या निष्काळजीपणाचा मोठा फटका
काझी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवर प्रसूती झालेल्या महिलेची आणि बाळाची तब्येत सध्या चांगली आहे. मात्र, येथील डाॅक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतोयं. रात्रीच्या वेळी रुग्णालयात केवळ वॉचमन उपस्थित होते, असा गंभीर आरोप शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी केलायं.
अहमदनगर : अहमदनगरच्या (Ahmednagar) काझी टाकळी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. काझी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच एका महिलेची प्रसूती झाल्याचे उघडकीस आले. रात्री दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत रुग्णालयाचे (Hospital) गेट न उघडल्याने गेटवरच महिलेची प्रसूती करण्याची वेळ आल्याचा आरोप केला जातोयं. रात्रीच्या वेळी रुग्णालयात केवळ वॉचमनच (Watchman) उपस्थित असल्याने महिलेची गेटवरच प्रसूती करण्यात आलीयं. शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केलांय.
रात्री दोन ते पहाटे चारपर्यंत रुग्णालयाचे गेट बंदच
अहमदनगर येथील काझी टाकळी येथे महिलेला प्रसूतीपूर्व वेदना रात्री अचानक सुरू झाल्याने महिलेला रूग्णालयात दाखल करण्यासाठी काझी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, रात्री दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत रुग्णालयाचे गेट कोणीच उघडले नसल्याने परिणामी या महिलेची प्रसूती रूग्णालयाच्या गेटवरची झाल्याचा गंभीर आरोप केला जातोयं.
डाॅक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतोय
काझी टाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवर प्रसूती झालेल्या महिलेची आणि बाळाची तब्येत सध्या चांगली आहे. मात्र, येथील डाॅक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतोयं. रात्रीच्या वेळी रुग्णालयात केवळ वॉचमन उपस्थित होते, असा गंभीर आरोप शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी केलायं. आरोग्यसेविका किंवा डॉक्टर वेळेत न आल्याने महिलेवर ही परिस्थिती ओढवली असल्याचे सांगितले जात आहे.