“भो भो करण्याची काहींना सवय”; कालीचरण महाराज यांची एमआयएमवर सडकून टीका

कालीचरण महाराज यांनी द केरला स्टोरीवर मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने पहावा त्यावर चिंतन करा, ते तुमच्याबरोबर होऊ शकते. धर्म आणि आई बहिणींची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अशा सिनेमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांना यावेळी व्यक्त केले.

भो भो करण्याची काहींना सवय; कालीचरण महाराज यांची एमआयएमवर सडकून टीका
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 9:23 PM

अहमदनगर : भगवे कपडे घालून कुणी स्वामी आणि गुरु होत नाही, आणि भगवे कपडे घातले म्हणजे त्यांना आता गुरु म्हणायला सुरुवात केली जात असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर केली होती. त्यावरून जोरदार हंगामा माजला आहे. इम्तियाज जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर टीका करताच कालीचरण यांनी त्यांना सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता जलील आणि कालीचरण महाराज यांचे वाकयुद्ध रंगले असल्याचे दिसून येत आहे.

कालिचरण महाराजांनी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या टिकेला उत्तर देताना म्हटले आहे की, भो-भो करण्याची काहींना सवय असते मात्र आम्ही आमचं काम करत राहू असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार आम्ही आमचे काम करत राहू.

तुम्ही येत असाल तर तुमच्यासोबत काम करू नसेल येत तर तुमच्याशिवाय काम करू अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे.

तुम्हाला बोलण्यापासून कोणी अडवलं, कोणी निंदा कोणी वांदा कालीकीर्तनचा आमचा धंदा, सत्य सांगण्याचा आमचा धंदा आहे आणि आम्ही बोलत राहू अशा शब्दात त्यांनी इम्तियाज जलील सुनावले आहे.

तसेच कालीचरण महाराज यांनी द केरला स्टोरीवर मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने पहावा त्यावर चिंतन करा, ते तुमच्याबरोबर होऊ शकते. धर्म आणि आई बहिणींची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अशा सिनेमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांना यावेळी व्यक्त केले.

जे हिंदू जण जागृती करत असतात त्यावर काही लोक बंदी आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे राज सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्नही केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.

स्वार्थ साधण्यासाठी बजरंग दलावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे आम्ही सत्य सांगतो आहे त्यामुळे त्यांच्या पोटात कळ उठत आहे असा टोलाही त्यांनी हिंदूविरोधी टीका करणाऱ्यांवर केला आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.