पारनेरच्या 11 गावात सर्वाधिक कोरोना रुग्ण, प्रशासनाकडून लॉकडाऊन, ‘कोरोनामुक्त पारनेर’ निलेश लंकेंच नवं मिशन

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना पारनेर तालुक्यात मात्र सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. पारनेर तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या त्या 11 गावात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेलाय.

पारनेरच्या 11 गावात सर्वाधिक कोरोना रुग्ण, प्रशासनाकडून लॉकडाऊन, 'कोरोनामुक्त पारनेर' निलेश लंकेंच नवं मिशन
लॉकडाऊन प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 4:29 PM

अहमदनगर: जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्ण सांख्य घटण्याचं नाव घेत नाही. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पारनेरमध्ये असल्यानं चिंतेच वातावरण आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना पारनेर तालुक्यात मात्र सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. पारनेर तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या त्या 11 गावात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेलाय. (Ahmednagar Parner 11 villages recorded high number corona patient local administration declared lockdown)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरची जगभर चर्चा

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरवात झालीये. मात्र, कोरोना काळात आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमुळे प्रकाशझोतात आलेला पारनेर मतदारसंघात मात्र कोरोना रुग्ण संख्या घटण्यास तयार नाही. नगर जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत, तर पारनेर वगळता सर्वच तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या घटली आहे. मात्र, पारनेरची कोरोना साखळी तुटण्यास तयार नाही. मुंबईशी सतत संपर्क असल्याने तेथील आकडे कमी होत नसल्याची चर्चा सुरू होती. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा दावा फेटाळलाय. तर पारनेरची रुग्ण संख्या नेमकी का वाढते याचा शोध घेण्याचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत.

निलेश लंकेंचं नवी मिशन, कोरोनामुक्त पारनेर

राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून पारनेर तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची सर्वत्र चर्चा झाली. करोनाचा संसर्ग टिपेला पोहोचला असताना तेथील सेवा आणि उपक्रम गाजले. निलेश लंके यांनी अहोरात्र कोरोना रुग्णांसाठी स्वतःला झोकून देत काम केले. त्यांच्या कामाची जागतिक पातळीवर देखील दखल घेण्यात आली. आता पारनेर तालुक्यातील आकडेवारी कमी होण्यासाठी आमदार लंके सरसावले आहे. तर, जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना टेस्ट केली जाते त्यामुळे आकडा वाढतोय असा दावा करत लवकरात लवकर ही आकडेवारी खाली येईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच पारनेर तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी उपयोजना सुरू केल्याचं देखील त्यांनी सांगितलंय.

लग्न समारंभ आणि इतर उपक्रमांसाठी पूर्व परवानगी

सध्या पारनेर तालुक्यात लग्न वाढदिवस उद्घाटन किंवा कोणताही समारंभ यास पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे. बाहेरुन आलेले पाहुणे 7 दिवस शाळेत क्वारंटाईन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. तर, पारनेर तालुक्यातील फक्त 11 गावांमध्येच कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्हा जवळ असल्याने अनेक लोक ये जा करतात. तर लग्न समारंभाला देखील लोक मोठ्या संख्येने हजेरी लावली जात आहे. त्यामुळेच ही संख्या वाढल्याचा खुलासा देवरे यांनी केलाय.

कोरोनाची दुसरीला आटोक्यात येत असताना पारनेर तालुक्यात मात्र रुग्णांचा आकडा वर खाली होत आहे. यावर प्रशासनाने आता खबरदारीचे उपाय सुरू केले असून तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता 11 गावांत कडक लॉकडाऊनचा निर्णय तहसीलदार ज्योती देवरे यांनी घेतला आहे. आगामी काही दिवसांमध्ये तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या निश्चितच कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पारनेरची गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्या

1 जुलै: 56 2 जुलै :74 3 जुलै :54 4 जुलै :58 5 जुलै: 57 6 जुलै :48 7 जुलै :61 8 जुलै: 76 9 जुलै :84 10 जुलै: 52 11 जुलै :71

इतर बातम्या:

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर सज्ज, 2 लाख 14 हजार बालकांच्या मातांचे प्राधान्याने लसीकरण 

कोल्हापूर जिल्ह्यासाठी लसीचे 60 हजार डोस, लसीकरणाला आठवड्याभरानंतर सुरुवात

(Ahmednagar Parner 11 villages recorded high number corona patient local administration declared lockdown)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.