अर्बन बँकेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या, अहमदनगरमध्ये खळबळ, आत्महत्येचं कारण काय ?
शेवगाव येथील अर्बन बँकेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अहमदनगर : शेवगाव येथील अर्बन बँकेतील व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी औषध घेऊन गोरक्षनाथ शिंदे यांनी स्वत:ला संपवलं. या घटनेमळे शेगाव, अहमदनगर तसेच बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Ahmednagar Shegaon Urban Bank manager committed suicide due to unknown reason)
बनावट सोने तारण ठेवल्याचा घोटाळा समोर आला होता
अर्बन बँकेच्या शेगाव येथील शाखेत 365 पिशव्या बनावट सोने तारण म्हणून ठेवल्याचा मोठा घोटाळा नुकताच समोर आला होता. त्यानंतर आता गोरक्षनाथ यांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे. गोरक्षनाथ शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहली आहे. ती चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी शिंदे यांनी लिहली चिठ्ठी
आत्महत्येपूर्वी गोरक्षनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय मचकूर आहे, ते समजू शकलेले नाही. मात्र, अर्बन बँकेत झालेल्या सोने तारण घोटाळ्याबाबत त्यांनी काही खुलासा केला आहे का ? की त्यांनी आत्महत्या करण्यामागचं कारण लिहलं असेल ? असे प्रश्न विचारले जात आहेत. तसेच याव्यतिरिक्त इतर तर्कवितर्कांना सध्या उधाण आले आहे.
शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
दरम्यान, शिंदे यांनी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबत येथील पोलिसांना सविस्तर माहिती विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाबाबत अजूनतरी मौन बाळगले आहे. येत्या काही दिवसांत शिंदे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्यातरी या आत्महत्येची शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इतर बातम्या :
हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली, नंतर बघितलं तर गाडीच गायब, उल्हासनगरातील धक्कादायक घटना
मनमाड हळहळलं ! विहिरीतून पाणी काढत असताना सासूचा तोल गेला, सूनेचा साडीचा पदर टाकून वाचवण्याचा प्रयत्न, पण…..https://t.co/u6Ht9YafEm#Nashik #Womanfellinwell #NashikNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 27, 2021
(Ahmednagar Shegaon Urban Bank manager committed suicide due to unknown reason)