म्युकरमायकोसिसने सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, शिर्डीत हळहळ

म्युकरमायकोसिस जास्त प्रमाणात पसरल्याने तिच्यावर सर्जरी करणंही शक्य नव्हतं. अथक प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना अपयश आले

म्युकरमायकोसिसने सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, शिर्डीत हळहळ
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 3:39 PM

शिर्डी : म्युकरमायकोसिसने (mucormycosis) सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. राहता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र तिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ahmednagar Shirdi Six months old girl dies after mucormycosis)

कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह

शिर्डी येथे राहणाऱ्या कोरके यांच्या कुटुंबातील सहा महिन्यांच्या श्रद्धाला कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यामुळे तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरु होते. मात्र तिचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर तिला म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसू लागली. व्हेंटिलेटवर असणाऱ्या श्रद्धा कोरकेला 13 तारखेला लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सर्जरी करणंही अशक्य

तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरु केले गेले मात्र उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्युकरमायकोसिस जास्त प्रमाणात पसरल्याने तिच्यावर सर्जरी करणंही शक्य नव्हतं. अथक प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना अपयश आले आणि तिचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.

एवढ्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस होण्याची आणि त्यामुळे मृत्यू होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रवरा हॉस्पिटलचे डीन डॉ. राजवीर भालवार यांनी केलं आहे.

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी हा काय प्रकार आहे?

म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे कोरोना विषाणूमुळे उद्भवते. हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.

म्युकरमायकोसिस सर्वाधिक धोका कोणाला?

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.

संबंधित बातम्या :

कोरोनापेक्षा म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर सातपट, साताऱ्यात प्रशासनाची डोकेदुखी वाढली

(Ahmednagar Shirdi Six months old girl dies after mucormycosis)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.