Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story : दीड लाखांचा खर्च, ४० लाख रुपयांचे उत्पन्न, शेतकरी झाला मालामाल

बबन धलपे यांनी शेतीत अनेक चढाव उतार पाहिलेत. कधीकाळी ही शेती आपल्याला एवढे उत्पन्न देईल, याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.

Success Story : दीड लाखांचा खर्च, ४० लाख रुपयांचे उत्पन्न, शेतकरी झाला मालामाल
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 3:57 PM

अहमदनगर : ही यशोगाथा आहे एका शेतकऱ्याची. नगरमधील भातोडी हे गाव. बबन धलपे नावाचा शेतकरी तिथं राहतात. गेल्या दहा वर्षांपासून ते टोमॅटोची शेती करतो. पण, यंदा त्याचे नशीब फडफडले. तब्बल ४० लाख रुपये या शेतकऱ्याला दीड एकर जागेतून मिळाले. यंदा त्यांच्या कष्टाचे चीज झाले. त्यांना किलोला सरासरी ८० ते १०० रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

सरासरी १०० रुपये मिळाला भाव

या टोमॅटोच्या लागवडीसाठी बबन धलपे यांनी एकूण अडीच लाख रुपये खर्च केले. टोमॅटोसाठी लागवड, खत, औषध फवारणी, तारेचे कुंपण असा खर्च त्यांनी केला. गेल्या दहा वर्षांत त्यांनी टोमॅटोचे अनेक चढाव उतार पाहिले. कधीकाळी एक रुपयाने टोमॅटोची विक्री केली. यंदा त्यांना विक्रमी १०० रुपये किलोच्या भावाने भाव मिळाला आणि त्यांचे नशीब फडफडले.

कधीकाळी रस्त्यावर फेकावे लागले होते टोमॅटो

बबन धलपे यांनी शेतीत अनेक चढाव उतार पाहिलेत. कधीकाळी ही शेती आपल्याला एवढे उत्पन्न देईल, याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. कधीकाळी त्यांना टोमॅटो रस्त्यावरती फेकून द्यावे लागले. मात्र यंदाच्या वर्षी उच्च दर मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केला.

भाजीपाल्याची शेती ठरली फायदेशीर

शेती फायद्याची नसल्याचं बरेच शेतकरी सांगतात. पण, शेतीत प्रयोग केल्यास त्यात नक्कीच फायदा होतो. या शेतकऱ्यानं पारंपरिक पिके सोडून भाजीपाल्याची शेती केली. शेवटी भाव मिळाल्याने तो मालामाल झाला. असे काही चांगले प्रयोग केल्यास शेतीएवढे उत्पन्न कुणीचं देत नसल्याचं प्रयोगशील शेतकरी सांगतात. दोन महिन्यांत चार लाख रुपये मिळव्यानं बबन यांचा आत्मविश्वास आणखी दुनावला गेला. आता ते शेतीला कधी दूषणं देणार नाही.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....