Chandrapur Accident | चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख, 9 मजुरांचा भाजून मृत्यू
आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये होते. प्लास्टिक पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल ( Chandrapur-Mul) महामार्गावर अजयपूर (Ajaypur) येथे दोन दिवसांपूर्वी अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून ही रक्क्म देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघात झाला. यानंतर मोठी आग लागली. ट्रकमधील 9 मजुरांचा भाजून मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. आता मृतकाच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. टँकरचा चालक (Driver) व वाहक यांचा मृत्यू झाला. तसेच लाकूड भरलेल्या ट्रकमधील सात जणांचा मृत्यू झाला. या सर्वांच्या कुटुंबीयांना प्रत्येक पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.
अशी घडली घटना
आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी ही आग विझवली. आगीमुळे मृतदेह राख झाल्याची विदारक दृश्ये होते. प्लास्टिक पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील टँकरमधील चालक अमरावती येथील हाफीज खान आणि वाहक वर्धा येथील संजय पाटील यांचाही यात मृत्यू झाला. लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी होते.
मृतकांची नावं
अमरावती येथील चालक हाफीज खान व वर्धा येथील वाहक संजय पाटील यांचाही यात मृत्यू झाला. तसेच अजय डोंगरे (वय 30) रा. बल्लारपूर व संदीप आत्राम (वय 22) रा. कोठारी यांचाही मृत्यू झाला. इतर सर्व मृतक लावारी दहेली येळीतील आहेत. त्यांची प्रशांत नगराळे ( 33), मंगेश टिपले (वय 30), भय्यालाल परचाके (वय 24), बाळकृष्ण तेलंग (वय 57) साईनाथ कोडाप (वय 40) अशी नावं आहेत. या मृतकांच्या कुटुंबीयांना आता आर्थिक मदत मिळणार आहे.