राजू शेट्टी म्हणालेत, दिवाळी गोड होऊ देणार नाही, आता अजित पवारांनी हिशेबच सांगितला
राजू शेट्टी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी उसाच्या एफआरपीबद्दल गुजरात आणि महाराष्ट्रातील कारखान्यांचं गणित सांगितलं.
सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सातारा दौऱ्यावर असताना सातारा येथील शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राज्यातील विविध विषयांवर अजित पवार यांनी भाष्य केलं. उसाच्या एफआरपीच्याबाबत राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर बोलत असताना अजित पवार यांनी सांगितले की मागच्या वर्षीची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो. राजू शेट्टी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी उसाच्या एफआरपीबद्दल गुजरात आणि महाराष्ट्रातील कारखान्यांचं गणित सांगितलं.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांचा दसरा कडू झाला तर नेत्यांना दिवाळी गोड करू देणार नाही असे राजू शेट्टी म्हणालेत.यासंदर्भात विचारलं असता अजित पवार यांनी महाराष्ट्रातलं साखर कारखान्यांचं गणित सांगितलं. मागच्या वर्षीची रिकव्हरी काय आहे हे पाहून आपण एफआरपी देतो. एक टक्का साखर वाढली तर 10 किलोला टनामागे 300 रुपयांचा फरक पडतो, असे वाटते. गुजरात मध्ये तीन टप्यात पैसे दिले जातात, त्यामुळे गुजरात राज्यातील शेतक-यांना 500 ते 600 रुपये टनाला जास्त भाव मिळतो, साखरेचं पोत तयार झाले की 1 रुपये व्याज सुरु होते, हे व्याज शेतक-यांच्याच पैशातून दिलं जातं. 15 तारखेला कारखाने सुरु होतायत, दहा कोटी रुपयांची साखर पडून आहे, म्हणजे दररोज रोज दहा लाख रुपये व्याज सुरु होत आहे, याचा भुर्दंड पडतो. आर्थिक प्रश्न आहेत, चर्चा सुरु आहेत, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्याचंया पध्दतीने सागंतायत त्या बाबत चर्चा करुन निर्णय घेता येईल, असं अजित पवार म्हणाले.
राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले होते?
शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली होती. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली होती.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांचा
आज पासून राज्यात शाळा सुरू होत आहेत. परंतु, अद्याप 18 वर्षाच्या आतील मुलांचे लसीकरण झाले नाही या बाबत अजित पवार यांना विचारले असता 12 ते 18 वर्षाच्या मुलांचं लसीकरण करावं अशी चर्चा आहे. मात्र,अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नसून केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. परंतु, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा आसून अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या:
आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
Ajit Pawar gave answer to Raju Shetti over warning on Sugarcane FRP