Ajit Pawar : माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानाच काढले पाहिजे, बदलापूर प्रकरणात अजित पवार यांच्या वक्तव्याने राज्यात खळबळ
Ajit Pawar Viral Statement : बदलापूर प्रकरणात राज्यात संतापाची लाट उसळली आहरे. याप्रकरणात शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. नागरिकांच्या दणक्यानंतर सर्वच यंत्रणा ठिकाणाऱ्यावर आल्या. आता या प्रकरणात अजितदादांचे रोखठोक वक्तव्य व्हायरल झाले आहे.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन बालिकांवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतरही शाळा प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कोणतीही कारवाई न केल्याने एकच संताप उसळला होता. याप्रकरणात बदलापूरकर रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली. यंत्रणा कामाला लागली. आता यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात या प्रकरणात अजितदादांचा संताप दिसून आला.
त्यांचे सामानाच काढले पाहिजे
यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात अजितदादांनी त्यांचा रोखठोकपणा दाखवला. राज्यात महिलांवर, मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानाच काढले पाहिजे, असे वक्तव्य, असा संताप त्यांनी व्यक्त केला. परत नाहीच, हे केलचं पाहिजे, असे नालायक काहीही लोक आहेत.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आहे. कशापद्धतीने आज काही लोक नालायकपणा करत आहेत. आज कुठं कुठं काही काही घटतंय, त्याच्याबद्दल कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने जो काय विरोध करायचा तो करा . लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, असे अजितदादा म्हणाले.
फाशीची शिक्षा द्या
गुन्हेगार कितीही मोठ्या बापाचा असू द्या फाशी व्हायला हवी अशी रोखठोक भूमिका अजितदादांनी यावेळी मांडली. बदलापूर अत्याचार प्रकरणात हयगय होणार नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. काही विकृत माणसे असतात काही नराधम असतात. पण सुरक्षतेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून आहे, आमच्या बहिणीवर जे हात घालतात त्याच्यावर कडक कारवाई करणार असे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. जो चुकीचा लागेल त्याला शासन झालं पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असेल. शक्ती कायदा लवकर मंजूर व्हावा या साठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
कुणालाही लाभापासून वंचित ठेवणार नाही
विरोधक टीका करत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधक कोर्टात जात आहे. माझी विनंती आहे कुणालाही लाभ पासून वंचित ठेवणार नाही. ओवाळनी म्हणून 3000 दिले. आणखी पैसे येतील. 45 हजार कोटी महिलांना मिळणार आहे. आमच्या चांगल्या योजनेला विरोधकानी पाहावं किती प्रतिसाद आहे, असा टोला त्यांनी लगावला.