अजित पवार यांचा मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारला टोला; म्हणाले, प्रत्येक आमदाराला सांगतात…

मुंबईत १७ कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले. यांच्याच जाहिराती. यांचेचं फोटो. यांचाचं उदोउदो. डबळी एसटी होती. त्याखाली फोटो होते. असे फोटो शोभतात तरी का, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार यांचा मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारला टोला; म्हणाले, प्रत्येक आमदाराला सांगतात...
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 4:13 PM

अहमदनगर : राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई दिली पाहिजे. यासाठी उद्या सभागृहात आवाज उठवणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगर येथे बोलताना सांगितलं. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले. अजित पवार म्हणाले, दोन रुपयांचा धनादेश दिला. हे संबंधित अधिकाऱ्याला दाखवलं. एस. एन. जावळे हा सोलापूरचा अडतव्यापारी होता. त्याचा परवाना निलंबित करण्यात आला. तू दोन रुपयांचा धनादेश दिला. आमची बदनामी झाली म्हणून निलंबित करण्यात आलं.

जाहिरातीसाठी किती खर्च

प्रत्येक आमदाराला सांगितलं जातं की तुला मंत्री करणार. पण, मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. प्रत्येक आमदाराला मंत्रीपदाचे आश्वासन कशासाठी असा प्रश्नही त्यांनी विचारला. एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले. पाच-सहा महिन्यात ५० कोटी रुपये जाहिरातीसाठी. मुंबईत १७ कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले. यांच्याच जाहिराती. यांचेचं फोटो. यांचाचं उदोउदो. डबळी एसटी होती. त्याखाली फोटो होते. असे फोटो शोभतात तरी का, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

कांद्याने केला वांदा

राज्य सरकार कापूस उत्पादकाला मदत करत नाही. हरभऱ्याची अशीच अवस्था आहे. कांद्याचा तर वांदा झाला आहे. दिल्लीत कांद्याचे भाव कमी-जास्त झाले. त्यामुळे दिल्लीचे सरकार गेले होते. जनतेने मनात आणल तर ते सरकारदेखील पाडू शकतात, असा इशारा अजित पवार यांनी दिला. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून हा अधिकार तुम्हाला दिला आहे. लोकशाही टिकेल की, नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यात जनतेने नाकारले असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारला यातून इशाराचं दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.